शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांनंतर महाविद्यालयांना मिळणार स्वायत्तता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांना अर्ज करणेदेखील सोपे होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठात समिती गठित : नियम बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांना अर्ज करणेदेखील सोपे होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाच्या अधिष्ठाता समितीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने स्वायत्त महाविद्यालये व स्वायत्ततेसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांसाठी नियमांबाबतीत चर्चा झाली. शिवाय जुन्या दिशानिर्देशांचीदेखील समीक्षा करण्यात आली. मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकांत कोमावार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, जुने अधिनियम, दिशानिर्देश व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे अध्ययन करून या समितीला नवीन दिशानिर्देशांचा आराखडा तयार करायचा आहे.स्वायत्त महाविद्यालयांसाठी असलेल्या दिशानिर्देशांमध्ये सुधारणा न झाल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. महाविद्यालयांनादेखील यासंदर्भात अडचण आहेच. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन दिशानिर्देश आल्यामुळे विद्यापीठाने यात बदल करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर