शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मृत्यूनंतर १९ वर्षांनी शेतकऱ्याला मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:41 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टातील प्रकरण : जमिनीचा मोबदला वाढवून दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आहे.व्यंकटराव देशमुख असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते चिंचोली, जि. यवतमाळ येथील रहिवासी होते. अरुणावती प्रकल्पासाठी त्यांची १४ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. जमिनीचा समाधानकारक मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी १९९५ मध्ये उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. अपील प्रलंबित असताना त्यांचा ३ आॅगस्ट १९९९ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर २०१७ मध्ये न्यायालयाने देशमुख यांच्या आठही मुलींना वारसदार म्हणून रेकॉर्डवर घेऊन अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल केले होते. त्यावर गेल्या १८ जानेवारी रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता अपीलकर्त्यांना एक लाख रुपये हेक्टर मोबदला व व्याजासह अन्य लाभ देण्यात यावेत असा आदेश राज्य शासनाला दिला. अपीलकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण देशमुख यांनी बाजू मांडली.३८०५ दिवसांचा विलंब क्षमापितया प्रकरणाची देशमुख यांच्या मुलींना माहिती नव्हती. लग्नानंतर त्या सासरी राहात होत्या. देशमुख यांच्या मृत्यूनंतर एका आदेशाचे पालन न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने २००७ मध्ये अपील खारीज केले होते. मुलींना २०१७ मध्ये या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून नावे रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ३८०५ दिवसांचा विलंब क्षमापित करून आठही मुलींना रेकॉर्डवर घेतले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी