शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

काँग्रेसनंतर आता भाजपाचे ‘उपोषणास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 9:02 PM

कॉंग्रेस पक्षाने उपोषण केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षातर्फेदेखील उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे. दिल्लीप्रमाणेच नागपुरातदेखील सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात हे उपोषण राहणार आहे. गुरुवारी नागपुरात उपराजधानीतील सर्व आमदार या उपोषणात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देगुरुवारी करणार सामूहिक उपोषण : संसदेतील गोंधळाचा करणार निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस पक्षाने उपोषण केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षातर्फेदेखील उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे. दिल्लीप्रमाणेच नागपुरातदेखील सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात हे उपोषण राहणार आहे. गुरुवारी नागपुरात उपराजधानीतील सर्व आमदार या उपोषणात सहभागी होणार आहेत.पंतप्रधानांनी १२ एप्रिल रोजी उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर नागपूर भाजपानेदेखील यासंदर्भात तयारी केली आहे. लोकशाही सुरळीत चालावी यासाठी संसदेचे कामकाज नियमित होणे आवश्यक आहे. विरोधकांचा खरा चेहरा उघड व्हावा, या उद्देशातून आम्ही १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत संविधान चौक येथे राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसणार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी दिली. उपोषणाला माजी खासदार अजय संचेती, आ.सुधाकर देशमुख, आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे,आ.डॉ मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन