शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नागपुरात अर्थसंकल्पानंतरच नवीन विकासकामांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 20:18 IST

२०१७-१८ या वर्षाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २२७१.९७ कोटीचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींनी तफावत असल्याने मंजूर विकास कामांना निधी उपलब्ध करताना अडचणी येत आहे. याचा विचार करता २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच नवीन विकास कामांना वित्त विभागाकडून निधी उपलब्ध केला जात आहे.

ठळक मुद्देमनपाच्या आर्थिक समस्या कायम : गेल्या वर्षात तिजोरीत १७०० कोटी जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१७-१८ या वर्षाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २२७१.९७ कोटीचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात नागपूर महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींनी तफावत असल्याने मंजूर विकास कामांना निधी उपलब्ध करताना अडचणी येत आहे. याचा विचार करता २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच नवीन विकास कामांना वित्त विभागाकडून निधी उपलब्ध केला जात आहे.गेल्या वर्षात मंजुरी देण्यात आलेल्या अनेक विकास कामांना अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. निधी उपलब्धतेनुसार मंजूर विकास कामांना निधी देण्याचे धोरण स्थायी समितीने स्वीकारले आहे. त्यामुळे तूर्त नवीन प्रस्तावांना मंजुरी न देण्याचे धोरण स्थायी समितीने स्वीकारले आहे.मुद्रांक शुल्क, विशेष अनुदान, मागील काही वर्षापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला निधी प्राप्त झाला आहे. परंतु महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ताकरापासून गेल्या वर्षात ३९२.१९ कोटींचा महसूल जमा होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात २१० कोटी जमा झाले. पाणीपट्टीतून १७० कोटी, नगररचना विभागाकडून १०१.२५ कोटी, बाजार विभाग १३.५० कोटी, स्थावर विभाग व जाहिरातीपासून १० कोटी, प्रस्तावित कर्जापासून १०० कोटी, महसुली अनुदान स्वरुपात ७४४.५८ कोटी, भांडवली अनुदान ३४६.०५ असे एकूण १०९०.६३ कोटी गृहित धरण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात हा आकडा १००० कोटींच्या पुढे गेलेला नाही. वर्षभरात जीएसटी अनुदानातून जवळपास ६०० कोटी प्राप्त झाले आहे.राज्य सरकारकडून मार्च महिन्यात जीएसटी व मुद्रांक शुल्काचे ६२ कोटी, मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातील विकास कामे व अन्य अनुदान म्हणून १०३ कोटी, २४ बाय ७ योजनेसाठी ४५ कोटी, एनआयटीकडून ५० कोटी, गेल्या काही वर्षापासून शासनाकडून प्रलंबित अनुदान १४९ कोटी ,शिक्षण विभागाचे २५.६२ कोटी, मलेरिया-फायलेरिया २५ कोटी, तसेच अन्य स्वरुपाचे अनुदान मिळाल्याने महापालिकेला थोडा दिलासा मिळाला.

     वर्ष              अर्थसंकल्प        प्रत्यक्षात जमा महसूल

२०१२-१३             ११२८                ९४०

२०१३-१४            १४२७               ८३१

२०१४-१५           १६४५              १०६४

२०१५-१६           १९६४               १२५०

२०१६-१७          २०४८               १५७६ 

२०१७-१८          २२७१               १७००

 
  
  
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प