शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अखेर ब र स ला ....

By admin | Updated: June 18, 2016 02:15 IST

उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे ४४ अंशावर पोहोचलेला पारा खाली घसरला.

नागपूर : उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे ४४ अंशावर पोहोचलेला पारा खाली घसरला. मात्र वादळाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड झाली. झिंगाबाई टाकळी परिसरातील इंदिरामाता नगर येथे आठ ते दहा घरांचे छत उडाले. दरम्यान अनेक फिडरवर बे्रकडाऊन झाल्यामुळे अर्ध्यां नागपुरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मागील काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी मान्सूनपूर्व पाऊस बरसला. सायंकाळी उपराजधानीसह संपूर्ण जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यात रात्री ८.३० वाजतापर्यंत नागपुरात २० मिमी. पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून, आता लगेच पेरण्यांना सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, हवामान विभागाने पुढील २० जूनपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची शुक्रवारपासूनच सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते. यात दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र काहीच वेळात त्यात खंड पडला. यानंतर सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान नागपूर शहरासह नरखेड तालुक्यातील जलालखेडा, मोवाड, सावरगाव, भिष्णूर परिसरातही चांगलाच पाऊस बरसला. तसेच काटोल व कळमेश्वर तालुक्यातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पारशिवनी तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान आलेल्या वादळाने काही गावांतील घरांचे छत उडाल्याच्या घटना पुढे आल्या. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. (प्रतिनिधी)१४ फिडरवर ब्रेकडाऊनसायंकाळी आलेल्या वादळी पावसात स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) १४ फिडरवर ब्रेकडाऊन झाल्याने अर्ध्यां नागपुरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर एसएनडीएलच्या पथकाने काही भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना रात्री उशिरापर्यंत फे्रन्डस कॉलनी व सिव्हिल लाईन्स परिसरातील डब्ल्यूसीएल फिडरवरील वीज पुरवठा सुरू करण्यात यश मिळाले नव्हते. यामुळे गिट्टीखदान, बोरगाव, गोरेवाडा, अनंतनगर, पटेलनगर, एकतानगर, बर्डे ले-आऊट, आकारनगर, प्रेरणा कॉलनी, आदिवासी कॉलनी, नर्मदा कॉलनी व वीरचक्र कॉलनी या भागातील नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. घरावरील छत उडालेवादळी पावसात झिंगाबाई टाकळी फरस येथील इंदिरामाता नगर येथील आठ ते दहा घरांचे छत उडाले. तसेच दोन घरांच्या भिंती पडल्याच्या घटना पुढे आल्या. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडेसुद्धा कोसळली. यात काही झाडे विजांच्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. अशातच काटोल रोडवरील एसएनडीएलच्या एका फिडरवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.