शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३३ वर्षांनी ते भेटले नातेवाईकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:56 IST

तब्बल ३३ वर्षानंतर समोर ८५ वर्षीय वडिलांना पाहून मुलांना अश्रू आवरता आले नाही. त्या दोघांना जगण्याची एक उमेद मिळाली होती.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालयाचा पुढाकार : ८५ वर्षीय वडिलांना घेण्यासाठी आली मुले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शीच मानसिक संघर्ष सुरू होता. या संघर्षात ते पोलिसांकडून प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाले. अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. मात्र गेल्या आठवड्यात अचानक ते डॉक्टरांजवळ गेले. डॉक्टरांचा हात हातात घेऊन ‘घर जाना है’ एवढेच म्हणाले. त्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडून घराचा शोध सुरू होता, परंतु पत्ता सापडत नव्हता. पण यावेळी त्यांनी नेमका पत्ता सांगितला. रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना ही बातमी दिली, परंतु त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मोबाईलवरून त्यांचे लाईव्ह बोलणे करून दिल्यावर त्यांचा विश्वास बसला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची दोन्ही मुले रुग्णालयात पोहचली. तब्बल ३३ वर्षानंतर समोर ८५ वर्षीय वडिलांना पाहून मुलांना अश्रू आवरता आले नाही. त्या दोघांना जगण्याची एक उमेद मिळाली होती.जसीम करिया (८५) रा. सुल्तानपूर, कादिपूर, तावाकलपूर उत्तर प्रदेश, बºया झालेल्या त्या मनोरुग्णाचे नाव. प्रादेशिक मनोरुग्णालयात ते ‘सुरती’ नावाने ओळखले जायचे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १९८५ मध्ये सुरती अचानक घरून निघून गेले. फिरत-फिरत ते नागपुरात आले. रस्त्यावर विक्षिप्त वागणूक करीत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. विचारपूस केली असता ते मनोरुग्ण असल्याची शंका आली. पोलिसांनी त्यांना कोर्टापुढे हजर करीत प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावरील उपचारात ३३ वर्षे निघून गेली. सोमवारी अचानक सुरती डॉक्टरांकडे आले. त्यांचा हात हातात घेऊन ‘घर जाना है’ असे म्हणत त्यांनी संवाद साधला. डॉक्टरांना आश्चर्य वाटले, परंतु त्यांची खात्री पटल्यावर त्यांनी रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक अनघा राजे-मोहरील यांना याची माहिती दिली. मोहरील यांनी त्यांच्याकडून पत्ता समजून घेतला. लागलीच त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या मदतीने सुल्तानपूर, कादिपूर, तावाकलपूर गावांचा शोध घेतला.

पोलीस त्यांच्या घरी गेले, परंतु होळीचा सण तोंडावर असल्याने आणि ३३ वर्षानंतर आपले वडील जिवंत असल्याच्या माहितीवर घरच्यांचा विश्वासच बसला नाही. अखेर मोबाईलच्या मदतीने दोघांचे ‘लाईव्ह’ बोलणो करून दिले, तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला. दुस:याच दिवशी ‘सुरती’ यांची दोन्ही मुले त्यांना घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात पोहचली. रुग्णालयातील सोपस्कार पार पडले. त्यांना दुस:या खोलीत घेऊन गेले, सामोर वडिलांना पाहून दोन्ही मुलांना रडू कोसळले. वडीलही भावुक झाले. ३३ वर्षानंतर वडील मिळाल्याचा तर  मानसिक आजारामुळे विश्वच हरवून बसलेल्या सुरती यांना आपले कुटुंब मिळाल्याचा आनंद दोघांच्या चेह:यावर होता. यावेळी रुग्णालय प्रशासनातर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे, वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, मोहरील यांनी सुरती यांना शाल, मिठाई देऊन निरोप दिला. जाताना नियमित औषधे घेण्याचा सल्ला डॉ. नवखरे यांनी दिला, तर कुठलीही अडचण आल्यास फोनवर संपर्क साधण्याची सूचना डॉ. गुल्हाने यांनी केली. यावेळी रुग्णालयातील अटेन्डंट सुरेश लोखंडे यांनी ८५वर्षीय सुरती यांना कपडे घालण्यापासून ते त्यांना आधार देण्यार्पयतची मदत केली. रुग्णालयासाठी ही घटना ते करीत असलेल्या सेवाकार्याला बळ देऊन गेली. 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर