शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

सोन्यात गुंतवणूक केलेली परवडली; भाव जीएसटीसह ७५,३९६ हजारांवर

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 23, 2024 21:31 IST

- चांदीचे भाव ९३,८३० : भाववाढीनंतरही ग्राहकांची खरेदी

नागपूर : देशातील प्रत्येक सराफाकडे ग्राहकाला ३ टक्के जीएसटी चुकते करून सोने-चांदी खरेदी करावी लागते. २३ मे २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचे भाव ७३,२०० रुपये असले तरीही ग्राहकाला ३ टक्के जीएसटीसह ७५,३९६ रुपयांत सोने विकत घ्यावे लागले.वर्षभरात २३ मेपर्यंत सोन्याचे भाव जीएसटीविना १२,६०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केव्हाही परवडणारी आहे. शिवाय चांदीच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २३ मे रोजी प्रतिकिलो भाव ९१ हजार रुपयांवर पोहोचले. हेच भाव एसटीसह ९३,७३० रुपयांवर गेले आहेत. वर्षभरात प्रति किलो चांदीच्या भावात १८,८०० रुपयांची वाढ झाली.

वर्षभरात किती हजारांनी वाढले भाव?  १ जून-२०२३ ६०,६००१ जुलै ५८,७००१ ऑगस्ट ६०,०००१ सप्टेंबर ५९,७००१ ऑक्टोबर ५७,८००१ नोव्हेंबर ६१,५००१ डिसेंबर ६३,०००१ जानेवारी-२०२४ ६३,७००१ फेब्रुवारी ६३,२००१ मार्च ६२,९००१ एप्रिल ६९,४००१ मे ७१,६००२३ मे ७३,२००(२४ कॅरेट सोन्याचे भाव, ३ टक्के जीएसटी वेगळा)का वाढले सोन्याचे भाव?जेव्हा मध्यवर्ती बँका राखीव म्हणून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात, तेव्हा चलनाचा पुरवठा वाढल्याने आणि सोन्याची उपलब्धता कमी असल्याने सोन्याच्या किमती वाढतात. चीन आणि भारतात दागिन्यांना मोठी मागणी आहे. औद्योगिक वापरातूनही सोन्याला मागणी वाढत आहे. शिवाय अनेक घटकांमुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८३.४० रुपये आहे. भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचे हेदेखील एक कारण आहे.

व्यापारी काय म्हणतात ...

जगात सोने खरेदी वाढल्याने दरवाढआंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. वर्र्षभरात चीनने स्वत:कडील डॉलर्सने सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. त्यासोबतच अन्य देशांनीही खरेदी वाढविली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा सोन्याचा साठा वाढवित आहे. अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताबदल होण्याची शक्यता आणि फेडरेल बँक ऑफ अमेरिकेने सप्टेंबरपर्यंत व्याजदर कमी करण्याचे संकेत दिल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. याशिवाय इस्त्राईलचे लगतच्या देशांसोबत सुरू असलेल्या युद्धात मुस्लिम देशांमध्ये दोन गट पडले आहेत. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. तसेच भारतात वार्षिक ७०० ते ८०० टन असलेल्या सोन्याच्या मागणीत दरवर्षी वाढ होत आहे. मंदीचे संकेत नसल्यामुळे सोने-चांदीचे दर वाढतच राहतील. राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन. 

टॅग्स :Goldसोनं