शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : गोसेखुर्द प्रकल्प मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:02 AM

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंत विदर्भातील ७८८ सिंचन प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच, ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यापैकी १३४ सिंचन प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प मार्च-२०२२, बावनथडी प्रकल्प डिसेंबर-२०१८, खडकपूर्णा प्रकल्प मार्च-२०१९, लोवर वर्धा प्रकल्प मार्च-२०२०, बेंबळा प्रकल्प मार्च-२०२१ तर, लोवर पेढी प्रकल्प डिसेंबर-२०२० पर्यंत पूर्ण केला जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

ठळक मुद्देविदर्भातील ७८८ सिंचन प्रकल्प पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंत विदर्भातील ७८८ सिंचन प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच, ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यापैकी १३४ सिंचन प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प मार्च-२०२२, बावनथडी प्रकल्प डिसेंबर-२०१८, खडकपूर्णा प्रकल्प मार्च-२०१९, लोवर वर्धा प्रकल्प मार्च-२०२०, बेंबळा प्रकल्प मार्च-२०२१ तर, लोवर पेढी प्रकल्प डिसेंबर-२०२० पर्यंत पूर्ण केला जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. वन विभागाची जमीन मिळत नसल्यामुळे १४ सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे. त्यात तीन मोठे, दोन मध्यम व नऊ लघु गटातील प्रकल्पांचा समावेश आहे. वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे १३ लघु व १ मध्यम असे एकूण १४ सिंचन प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा विरोध व अन्य कारणांमुळे सहा लघु सिंचन प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. तसेच, सहा लघु सिंचन प्रकल्प जल संसाधन विभागाला हस्तांतरित करण्यात आले आहेत. जीएसटीमधील अस्पष्टता, वेळोवेळी लागू झालेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे, नवीन धोरणे इत्यादी कारणांमुळे सिंचन प्रकल्पांची कामे वेळेवर पूर्ण करता आली नाहीत, अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यासंदर्भात जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांच्या जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. प्रकरणावर ३ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. श्रीधर पुरोहित तर, सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल कामकाज पाहत आहेत.असा मंजूर झाला निधीवर्ष                  निधी (कोटीमध्ये)२०१४-१५        ३७६४.०८६२०१५-१६        ३७९६.१५७२०१६-१७        ३४८८.०८६२०१७-१८       ३५४३.११८२०१८-१९        २९१९.२०९----------------------एकूण १७५१०.६५७

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प