शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 15:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यांनी आज आरोग्य उपसंचालकाच्या कार्यालयापुढे दिवसभर धरणे दिले.नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागात ७०० च्या वर एनआरएचएमचे कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे ...

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान(एनआरएचएम)कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यांनी आज आरोग्य उपसंचालकाच्या कार्यालयापुढे दिवसभर धरणे दिले.नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागात ७०० च्या वर एनआरएचएमचे कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील यंत्रणा सुरळीत सुरू आहे. सरकार आता ही यंत्रणासुद्धा बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी काही अटी आणि शर्ती शासनाने टाकल्या आहेत. या अटीनुसार या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन होणार असून, त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. त्यातून वेतनवाढ होणार आहे. परंतु ही अट कर्मचाऱ्यांना जाचक वाटत आहे. यात कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचीसुद्धा वेळ येणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांची सहा-सहा महिन्याची पुनर्नियुक्ती प्रक्रिया शासनाने राबविली आहे. यालाही कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर’लागू केले आहे. त्यानुसार त्यातही त्रुटी आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे. २००५ पासून एनआरएचएमच्या माध्यमातून हे कर्मचारी आरोग्य विभागात सेवा देत आहेत. बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात ही यंत्रणा सक्षम ठरली आहे. लसीकरण, प्रसूती, ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ही यंत्रणा प्रयत्नरत आहे.आरोग्य विभागातील रिक्त जागांची जबाबदारी या यंत्रणेने अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. परंतु शासनाने त्यांच्यावर लादलेल्या जाचक अटी व शर्तींच्या विरोधात हे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे. त्याचा परिणाम गुरुवारपासून ग्रामीण भागात दिसायला लागला आहे. आज बहुतांश उपकेंद्रे बंद होती. शासनाने या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन द्यावे, अशा मागण्या या कर्मचाºयांच्या आहेत. एनआरएचएम अधिकारी-कर्मचारी महासंघ नागपूरचे अध्यक्ष नीलेश सोनवणे, उपाध्यक्ष रज्जू परिपगार, कांचन राऊत, उन्मेश कापसे, लता माहुरे, माला काकडे, मीना महाजन, रत्ना कांबळे यांच्या नेतृत्वात  आंदोलन करण्यात आले.हक्काच्या घरात आंदोलनाची परवानगी नाकारलीजि.प.च्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे. परंतु यांना जि.प.मध्ये आंदोलन करण्याची परवानगी सीईओंनी नाकारली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यagitationआंदोलन