शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नागपूर विमानतळावर विमानाला दहशतवाद्यांनी केले ‘हायजॅक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी ४ वाजता प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर अचानक सीआयएसएफ आणि पोलिसांच्या शीघ्र कृती पथकाच्या हालचाली वाढल्या. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मोठ्याने आवाज करीत अग्निशमन दलाचे वाहन आणि रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचली. आपात्कालीन स्थिती निर्माण झाली. परंतु ही मॉक ड्रील होती.

ठळक मुद्देतीन दहशतवादी ठार, एकाला अटकघाबरू नका , ही होती मॉक ड्रील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी ४ वाजता प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विमानतळावर अचानक सीआयएसएफ आणि पोलिसांच्या शीघ्र कृती पथकाच्या हालचाली वाढल्या. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मोठ्याने आवाज करीत अग्निशमन दलाचे वाहन आणि रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचली. आपात्कालीन स्थिती निर्माण झाली. परंतु ही मॉक ड्रील होती. यात चार बनावट दहशतवाद्यांनी एक विमान हायजॅक करून नागपूर विमानतळावर उतरविले. त्यांचा मुकाबला करून प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी या मॉक ड्रीलच्या माध्यमातून कर्मचारी आणि जवानांच्या दक्षतेबाबत तपासणी करण्यात आली.मंगळवारी दुपारी ३.४० वाजता नागपूर हवाई नियंत्रण कक्षाला हैदराबादवरून चेन्नईला जात असलेल्या एका विमानाला दहशतवाद्यांनी हायजॅक केल्याची गुप्त माहिती मिळाली. यासोबतच विमानाला नागपूर विमानतळावर उतरविण्याची परवानगी मागण्यात आली. पायलटच्या सूचनेवरून एटीसीने दिशानिर्देशांचे पालन करीत विमान उतरविण्याची परवानगी दिली. दरम्यान, सीआयएसएफच्या जवानांनी ४ वाजेपूर्वी मोर्चा सांभाळला. त्यानंतर शहर पोलिसांचे शीघ्र कृती पथक शस्त्रांसह विमानतळावर पोहोचले. पोलिसांच्या पथकानेही आपली जागा घेतली. बसच्या रूपाने हायजॅक झालेल्या विमानाला आयसोलेशन बे मध्ये पार्क करण्यात आले. या सर्व बाबी घटना खरी वाटावी अशाच झाल्या. साधारणपणे बे मध्ये इतर कमर्शियल विमाने उभी राहतात. अशास्थितीत हायजॅक केलेल्या विमानात जर काही स्फोटके असल्यास इतर विमानांना धोका पोहोचू शकतो. यामुळे या विमानास आयसोलेशन बे मध्ये पार्क करण्यात आले. दरम्यान एमआयएलचे क्रॅश फायर टेंडर, महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस व सीआयएसएफचे श्वान पथक कामाला लागले. यावेळी दहशतवाद्यांनी आपल्या मागण्या पुढे केल्या. त्यांच्या मागण्यांवर अधिकारी चर्चा करीत होते. अधिकाऱ्यांनी त्यांना उशिरापर्यंत चर्चेत गुंतवून ठेवले. त्यानंतर आॅपरेशन सुरू झाले आणि जवानांनी विमानाच्या आत जाऊन तीन दहशतवाद्यांना ठार केले आणि एकाला जिवंत पकडले. हायजॅक केलेल्या विमानात ४१ प्रवासी होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात येऊन परत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. ही मॉक ड्रील तब्बल दीड तास चालली. त्यापूर्वी एअरपोर्टच्या टर्मिनल बिल्डिंगमधून प्रवासी आणि एअर लाईन्सच्या कर्मचाऱ्

यांना बाहेर काढून त्यांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर उभे राहण्यास सांगण्यात आले.त्रुटींबाबत झाली चर्चामॉक ड्रीलनंतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत आॅपरेशनमध्ये कोण किती वेळात पोहोचले. कुणी कधी कारवाई सुरू केली आणि त्यात काय त्रुटी राहिल्या, याबाबत चर्चा करण्यात आली. जुन्या एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंगच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता बैठक झाली. बैठकीला एमआयएलचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, एमआयएलचे सुरक्षा अधिकारी यशवंत सरडकर, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट रवी कुमार उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सर्व विभागांनी वेळेवर कारवाई केल्याचे आढळून आले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर