शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वकिलावरील हल्ला प्रकरण : आरोपी मरण्या-मारण्याचा निर्णय घेऊनच आला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:54 IST

अ‍ॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अ‍ॅड. नारनवरे यांना त्यांच्या नातेवाईकांनी मेयोतून एका खासगी इस्पितळात हलविले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देप्राथमिक तपासातील पोलीस निष्कर्ष, जखमी वकिलाची प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अ‍ॅड. नारनवरे यांना त्यांच्या नातेवाईकांनी मेयोतून एका खासगी इस्पितळात हलविले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास आरोपी नोकेशने अ‍ॅड. नारनवरे यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यापूर्वीच नोकेशने विष पिले होते. त्यामुळे त्याला मेयोत दाखल केल्याच्या काही वेळानंतर डॉक्टरांनी नोकेशला मृत घोषित केले. अ‍ॅड. नारनवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कुºहाडीचे घाव बसल्यामुळे त्यांच्यावर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मेयोतून मेडिकल चौकातील एका खासगी इस्पितळात हलविले. तेथे त्यांच्या चेहºयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, डोक्यावर गंभीर स्वरुपाचा घाव असल्याने शस्त्रक्रिया करतानाच धोका होऊ शकतो, याची डॉक्टरांनी अ‍ॅड. नारनवरे यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली. त्यामुळे डोक्यावरची शस्त्रक्रिया करायची की नाही, त्याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांना निर्णय सांगितला नाही. परिणामी अ‍ॅड. नारनवरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.राज्यातील विधी वर्तुळात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहेत. या प्रकरणाशी एक नाजूक पैलू जुळला असल्याने तसेच प्रकरण वकिलाशी संबंधित असल्याने पोलीस या संबंधाने अत्यंत सावधगिरीने तपास करीत आहेत.मृत नोकेशचे भाऊ क्रांती कुंडलिक भास्कर (वय ३१) हे अंबाझरी आयुध निर्माणीत कार्यरत आहेत. त्यांचे आईवडील सध्या त्यांच्याकडेच राहतात. शनिवारी दुपारी नोकेशचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर नोकेशवर वाडीच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीadvocateवकिल