शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते : रमेश मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:19 IST

भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधिलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद असायाला हवा, असे मत ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’चे (बीएपीआयओ) अध्यक्ष व ‘जीएपीआयओ’चे जागतिक अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देरुग्ण-डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधिलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद असायाला हवा, असे मत ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’चे (बीएपीआयओ) अध्यक्ष व ‘जीएपीआयओ’चे जागतिक अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी येथे व्यक्त केले.‘ग्लोबल असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’तर्फे (जीएपीआयओ) ‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’, नागपूरच्यावतीने दहावी वार्षिक परिषद ‘गॅपीओ-२०२०’ चे आयोजन ३ ते ५ जानेवारी २०२० मध्ये नागपुरात करण्यात आले आहे. या परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ‘जीएपीआयओ’च्या ब्रिटन शाखेचे संचालक डॉ. अशोक खंडेलवाल, डॉ. उदय बोधनकर, डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. शरद देशमुख, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. हरीश वरभे आदी उपस्थित होते.रुग्णाशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यकडॉ. मेहता म्हणाले, साडेचार वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शरीरविज्ञानाच्या बारीकसारीक बाबींसोबतच डॉक्टरांना रुग्णांशी संवाद कसा साधायचा, याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रुजविण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.डॉक्टर-रुग्णांमध्ये विश्वास रुजविण्याची गरज : डॉ. खंडेलवालडॉ. अशोक खंडेलवाल म्हणाले, डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे. हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करता येतो. पण डॉक्टरांना प्रत्येक रुग्णासोबत आणि त्याच्या नातेवाईकांसोबत संवादासाठी वेळ देणे दुरापास्त होते. यामुळे यातून मार्ग काढणे म्हणजेच दोघांमध्ये संवाद घडवून आणणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर