शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया हायकोर्टाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 20:47 IST

यापुढे इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सूक्ष्म नजर राहणार आहे. भविष्यामध्ये प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये याकरिता न्यायालयाने सोमवारी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करून त्यांना तीन आठवड्यात नियमानुसार याचिका तयार करण्यास सांगितले.

ठळक मुद्देगैरव्यवहाराची गंभीर दखल : स्वत:च दाखल केली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यापुढे इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सूक्ष्म नजर राहणार आहे. भविष्यामध्ये प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये याकरिता न्यायालयाने सोमवारी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करून त्यांना तीन आठवड्यात नियमानुसार याचिका तयार करण्यास सांगितले.महाल व काँग्रेसनगर येथील न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयांवर झालेल्या अन्यायामुळे अकरावी प्रवेशातील गोंधळ प्रकाशात आला. त्यानंतर न्यायालयाने आधी या महाविद्यालयांच्या तक्रारीचे निराकरण करून या प्रकरणाला व्यापक स्वरूपात हाताळण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वी न्यायालयाने अकरावी प्रवेशात यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. न्यू इंग्लिश महाविद्यालयांशी संबंधित याचिका न्यायालयाने निकाली काढल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार न्यू इंग्लिश महाविद्यालयांना नियमानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी देण्यात आले आहेत. त्यांची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.असा झाला गोंधळगेल्या २१ जून रोजी द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील पहिली प्रवेश फेरी पार पडली. त्या फेरीत न्यू इंग्लिश महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला नव्हता. परिणामी, खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश महाविद्यालयांना प्रथम पसंतीक्रम दिला होता, त्यांना या महाविद्यालयांत प्रवेश घेता आला नाही. त्यांना अन्य महाविद्यालये वाटप करण्यात आलीत. यासंदर्भात चौकशी केली असता, हे तांत्रिक चुकीमुळे घडल्याचे सांगण्यात आले. अधिक खोलात शिरल्यानंतर कोचिंग क्लासेससोबत भागीदारी असलेल्या निवडक महाविद्यालयांना गुणवत्तापूर्ण विद्यार्थी मिळावे याकरिता प्रवेश प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार केला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशन, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण