शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त

By निशांत वानखेडे | Updated: October 10, 2023 17:50 IST

दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  

नागपूर : दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  अशा एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या ७ व्या फेरीपासून सुरू करण्यात आली आहे. ही अंतिम फेरी आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्या आटोपल्या आहेत. 

अंतिम फेरी ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेशाचा भाग-२ म्हणजे महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरून लॉक करायचा आहे. भाग १ भरताना विद्यार्थ्यांनी सहा विषयाच्या ६०० पैकी मिळालेले गुण नोंदवायचे आहेत. याशिवाय आधी कॉलेज मिळाल्यानंतरही प्रवेश न केल्याने प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजतापर्यंत भाग २ भरून अर्ज लॉक करायचा आहे. १४ ऑक्टोबर  रोजी प्रवेश यादी तयार करून १६ ऑक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचे आहेत.

दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या सहाव्या फेरीनंतर ५४,५६० जागांपैकी ३२,११९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २२,४४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या जवळपास ७० टक्के, वाणिज्य शाखेच्या ६० टक्के तर विज्ञान शाखेच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत.

कोणत्या शाखेच्या किती रिक्त?

  • शाखा       एकूण जागा         प्रवेश         रिक्त
  • कला         ८२००             ३३८२        ४८१८
  • वाणिज्य     १६०४०            ७८११        ८२२९
  • विज्ञान       २७०३०           १९७२२       ७३०८
  • एमसीव्हीसी  ३२९०             १२०४        २०८६ 
टॅग्स :nagpurनागपूरssc examदहावी