शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 10:23 IST

पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकोविडमुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात अडचण

नागपूर : कोविडच्या प्रकोपामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी आल्याने मुदत संपत असलेल्या नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश नगरविकास मंत्रालयाने जारी केला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेचा कार्यकाळ येत्या १२ फेब्रुवारीला तर काटोल, उमरेड, कळमेश्वर-ब्राम्हणी, खापा, मोहपा, नरखेड, रामटेक व सावनेर नगरपरिषदेचा कार्यकाल ८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे कार्यकाल संपल्याच्या तारखेपासून संबंधित उपविभागीय अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहतील. यापूर्वीच मुदत संपल्यामुळे वाडी व मोवाड या नगरपरिषदेवर तर भिवापूर नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही-लोणवाही, बल्लारपूर, वरोरा, मुल, राजोरा, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या नगरपरिषदांचा कार्यकाल संपताच प्रशासक सूत्रे स्वीकारतील.

वर्धेतील ६ नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त

- वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिगंणघाट, आर्वी, देवळी, पुलगांव व सिंदीरेल्वे या सहा नगरपरिषदांचा कार्यकाळ २६ डिसेंबरलाच संपला आहे. त्यामुळे या सहाही नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरपरिषद - मुदत

कामठी - १२ फेब्रुवारी

काटोल - ८ फेब्रुवारी

उमरेड - ८ फेब्रुवारी

कमळमेश्वर - ८ फेब्रुवारी

खापा - ८ फेब्रुवारी

मोहपा - ८ फेब्रुवारी

नरखेड - ८ फेब्रुवारी

रामटेक - ८ फेब्रुवारी

सावनेर - ८ फेब्रुवारी

भंडारा - ६ फेब्रुवारी

तुमसर - ७ फेब्रुवारी

पवनी - १५ जानेवारी

साकोली - १५ जानेवारी

गोंदिया - ९ फेब्रुवारी

तिरोडा - ९ फेब्रुवारी

सिंदेवाही - २६ डिसेंबर

बल्लारपूर - १ जानेवारी

वरोरा - ३० डिसेंबर

मुल - ३० डिसेंबर

राजुरा - ३० डिसेंबर

गडचिरोली - १८ जानेवारी

देसाईगंज - १६ जानेवारी

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भElectionनिवडणूक