शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनोरुग्णांच्या मृत्यू सत्राने प्रशासन हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:38 IST

मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच आहे. गुरुवारी २४ मे रोजी आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. २१ दिवसांत सहा मनोरुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सहाही मृत्यू हे मेडिकलमध्येच उपचारादरम्यान झाल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : २१ दिवसांत सहा मनोरुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांचे मृत्युसत्र सुरूच आहे. गुरुवारी २४ मे रोजी आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. २१ दिवसांत सहा मनोरुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सहाही मृत्यू हे मेडिकलमध्येच उपचारादरम्यान झाल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.जीवन मंगुलाल केवलानी (५४) रा. नागपूर असे मृत मनोरुग्णाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन हे मनोरुग्णालयाचे रुग्ण होते. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. आठवडाभरापूर्वी त्यांच्यामध्ये ‘गॅस्ट्रो’ची लक्षणे दिसून आली सोबतच मानसिक स्थितीही ढासळली. नातेवाईकांनी त्यांना २१ मे रोजी पुन्हा मनोरुग्णालयात उपचारासाठी आणून भरती केले. त्यांच्यावर डॉक्टरांनी एक दिवस उपचार केला. बुधवार २३ मे रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये दाखल केले. त्यानंतर मेडिकलमध्ये त्यांच्या विविध तपासण्या झाल्या. या तपासण्यामध्ये त्यांचे यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच गुरुवार २४ मे रोजी दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाला.जीवन यांच्या मृत्यूसह २१ दिवसांत सहा मनोरुग्णांचा मृत्यू एकट्या मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झाला आहे. मनोरुग्णांच्या मृत्यूची मालिका सुरूच असून, थांबण्याचे नाव घेत नसल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे. काहीजण मनोरुग्णालयाच्या कारभारावर तर काही मेडिकलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत आहे. मनोरुग्णांकडे काय लक्ष द्यायचे, याच भावनेतून उपचार होत असल्याने मृत्यूची मालिका सुरू असल्याचे काहींचे म्हणणे आहे.आतापर्यंत १८ जणांचा मृत्यूजानेवारी ते फेबु्रवारी २०१८ या दोन महिन्यातच सात मनोरुग्णांचा, तर पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिन्यात एकूण सहा मनोरुग्णांचा मृत्यू झाल्याने मनोरुग्ण व कर्मचारी मिळून एकूण १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे हे सत्र थांबणार कधी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.या आहेत समस्या

  • मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यावर ही माहिती समोर आली, रुग्णालयात भोजनाचा दर्जा योग्य असला तरी औषधांचा तुटवडा आहे. हाफकिन्स कंपनीला औषधांची जबाबदारी दिल्यापासून औषधांची समस्या निर्माण झाली आहे.
  •  मेडिकलमधून एक दिवसाआड तीन डॉक्टरांची चमू मनोरुग्णालयात येऊन भरती रुग्णांची तपासणी करतात. परंतु चमूकडून योग्य पद्धतीने तपासणी होत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे रुग्णाला वेळीच औषधोपचार मिळत नाही.
  •  रिक्त जागा भरण्यात आल्या नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. यामुळे त्यांचे प्रत्येक रुग्णावर लक्ष राहत नाही. दुसरीकडे ते स्वत:च्या समस्याही डॉक्टरांना सांगत नसल्याने त्यांच्या जीवावरही बेतत आहे.
टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयDeathमृत्यू