औद्योगिक गरजेनुसार कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी नागपूर महानगरातील उद्योग समूह, मिहान प्रकल्प, बुटीबोरी मॅनुफॅक्चर्स असोसिएशन यांच्यासोबत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास विभाग व प्रशासनातील सर्व संबंधित विभाग सध्या उद्योग समूहांना आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकास व प्रशिक्षणासाठी प्रयत्नरत आहेत. जिलल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमाला नवी दिल्ली येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, बुटीबोरी मॅनुफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, ज्येष्ठ उद्योजक मोहन गर्ग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह उपस्थित होते.
यावेळी काैशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना जिल्हाधिकारी ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.