शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

प्रशासनाचे भाजपाशी सख्य, शिवसेनेशी दुरावा

By admin | Updated: April 13, 2017 03:09 IST

जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर सध्या शिवसेना चांगलीच नाराज आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्याचा अनुभवही आला.

जिल्हा परिषद : शिवसेनेची प्रशासनाशी झोंबाझोंबी नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर सध्या शिवसेना चांगलीच नाराज आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्याचा अनुभवही आला. जि.प.चे प्रशासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ऐकतच नसल्याचा आरोप करीत प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. बैठकीत उपाध्यक्ष शरद डोणेकर चांगलेच आक्रमक होत, यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या हाताखालील अधिकारी ऐकत नसतील तर याला काय म्हणावे ? अशा शब्दात सीईओंची कानउघडणी केली. त्यामुळे शिवसेनेचे जि.प.तील पदाधिकारी, सदस्य यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चांगलीच झोंबाझोंबी झाली. प्रशासनाचे भाजप पदाधिकाऱ्यांशी सख्य व शिवसेनेशी दुरावा असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला. मुळात जि.प.च्या प्रशासनावर सर्वच सदस्य व पदाधिकारी नाराज आहेत. उघडपणे सदस्यांकडून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जाते. अधिकारी बेजबाबदार असल्यामुळेच आज समाजकल्याणच्या सायकली, शिलाई मशीन, कृषीचे साहित्य लाभार्थ्यांना मिळू शकले नाही. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पाणी टंचाईच्या कामांना अद्यापही सुरुवात झाली नाही. टंचाईच्या काळात पाणीपुरवठा विभागाला कार्यकारी अभियंता मिळाला नाही. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपअभियंत्याची जागा आठ महिन्यापासून रिकामी आहे. प्रशासनाकडे टंचाईचे ६० लाख रुपये असताना, भूजल सर्वेक्षकांना वाहने उपलब्ध करून देऊ शक ले नाही. चौकशी समितीचा अहवाल अधिकारी वेळेवर देऊ शकत नाही. असे आरोप सर्व सदस्यांकडून प्रशासनावर होत आहे. परंतु शिवसेनेला प्रशासनाने वैयक्तिक घेतल्याचे दिसते आहे. रामटेक पंचायत समितीत शिवसेनेच्या सभापतींच्या कार्यालयाला बीडीओंने कुलूप ठोकले. शिवसेनेच्या जि.प. सदस्य शोभा झाडे यांनी पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्याला माहिती मागितली असता, त्यांनी दिली नाही. त्यामुळे वृत्तपत्रात माहिती दिली नसल्याची बातमी छापून आल्याने, त्या विस्तार अधिकाऱ्याने जि.प. सदस्यांना दोन नोटीस बजावल्या. किरणापूर ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर भंगार विक्री केली. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी होती. ती स्थायी समितीच्या बैठकीत जाहीरपणे उघड झाली. (प्रतिनिधी) शिवसेनेला पाडले एकटे शिवसेनेबरोबरच भाजप व काँग्रेसचे सदस्यही प्रशासनावर नाराज आहे. उघडपणेही बोलतात. परंतु जेव्हा शिवसेनेचे सदस्यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी झोंबाझोंबी झाली, तेव्हा इतर पक्षाच्या सदस्यांनी आपली भूमिकाच मांडली नाही. उलट भाजप-काँग्रेसचे सदस्य एकत्र येऊन शिवसेनेची खिल्ली उडविताना दिसले.