शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:05 IST

घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुशंतासिंह राजपूत, दिशा सालियन व रिया चक्रवती प्रकरणावरुन तापलाय. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सत्ता पक्षावर जोरदार टीका केली. ज्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपाल यांनी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला, त्यांना व घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. एका ३२ वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

विधिमंडळ अधिवेशनाचा आज ४ था दिवस एयु.. एयु कौन है? च्या मु्द्दयाने गाजतोय. सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे असून या प्रकरणाची आता एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सभागृहातील वर्तनावर आक्षेप नोंदवित टीका केली. ते म्हणाले, लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या.. महत्वाची गोष्ट म्हणजे एनआयटीचा जो घोटाळा आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिल्लीहून दिशा सालियन प्रकरणी चौकशी अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. तो पाहून पुढील चौकशीचे स्वरुप ठरविले जाईल, कोणाकडे अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असे फडणवीस म्हणाले आहेत. 

नितेश राणे काय म्हणाले...

एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला.  सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत