शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:41 IST

कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

ठळक मुद्देवर्षभर पावसाची हजेरी फळाला, टँकरनेही पुरवठा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यावर्षी पावसाने वर्षभर मेहेरबानी केली असल्याने नैसर्गिक आणि कृ त्रिम पाणवठे फुल्ल असून प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.उन्हाळा आला की पाणीप्रश्न पेटतो. मानवाला जसा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तसा तो वन्यजीवांच्या वाट्यालाही असतोच. आकाशात सूर्य आग ओकत असताना जंगलात पाणवठे कोरडे पडले असतात. अशावेळी प्राण्यांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. दरवर्षी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात आणि मानव- वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अनेक प्राणी पाण्याच्या शोधात विहिरी किंवा तलावात पडल्याच्या घटना समोर येतात. वनविभागाला टँकरद्वारे दरवर्षी जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकावे लागते. काही स्वयंसेवी संस्थाही या कामात विभागाची मदत करतात. यावर्षी मात्र अशी भीषण पाणीटंचाई दिसून येत नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वर्षभर झालेली वरुणराजाची हजेरी लाभदायक ठरली आहे.पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले, वनविभागाला दरवर्षी जंगलात पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करावे लागते. त्यानुसार कृ त्रिम पणावठ्यांची निर्मिती केली आहे. पेंच प्रकल्पात ११४ नैसर्गिक, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणारे १४५ कृ त्रिम आणि सौरऊर्जेवर चालणारे ६४ पाणवठे आहेत. बोर अभयारण्यात ३२ नैसर्गिक, ८२ कृ त्रिम व ४६ सौर पंप आहेत. दुसरीकडे टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यात २८ नैसर्गिक, १४ कृ त्रिम आणि ५० सौर पंप आहेत. या पाणवठ्यांवर पुरेसा पाणीसाठा असून सध्यातरी कमतरता नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातही पाणवठ्यावर मुबलक पाणीसाठा असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज पडली नाही. गरज पडल्यास तसे करण्यात येईल, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचा विश्वास स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला.वणवे आणि नियंत्रणाकडे लक्षउन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जंगलसफारीकडे लोकांचा कल वाढतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे वन्य पर्यटन बंद असल्याने पर्यटकांची व्यवस्था करण्याचा कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला आहे. मात्र उन्हाळ्यात जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वणवे नियंत्रित करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांकडे कायम आहे. याशिवाय तस्करी रोखण्यासाठी गस्तही वाढविण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलWaterपाणी