शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यासाठी पाणीटंचाईचा सात कोटींचा अतिरिक्त आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:31 IST

जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़ उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखडा आहे़

ठळक मुद्देआणखी १२ गावांत धावणार टँकर : नळ योजनांची दुरुस्ती, खोलीकरणाला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़. उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखडा आहे़.यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांच्या संख्येत आणखी १३ ने वाढ होण्याची शक्यता आहे़ एप्रिल ते जून महिन्याचा आराखडा हा ३३१ गावांसाठी ४ कोटी ६ लाख ६० हजार रुपयांचा होता़ या उपाययोजना तोक ड्या पडत होत्या़ कामाची गतीही मंदावली होती़ तशा आशयाच्या तक्रारी स्थानिक सरपंचाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तशी मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागानेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती़ त्यानुसार अतिरिक्त आराखड्याला मंजुरी देण्यात आली़ २४९ गावांत यातून उपाययोजना होईल़ बोअरवेल खोदकामाचे काम पूर्णत्वास आले आहे़ मंजूर आराखड्यात नळ योजनांची दुरुस्ती आणि विहीर खोलीकरणाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे़ नळ योजनांची दुरुस्ती ही ७७ गावांमध्ये ३ कोटी ६४ लाख, नवीन विंधन विहिरी १०२ गावांत होईल़ यावर १ कोटी ३७ लाख ८० हजार रुपये, तात्पुरत्या नळ योजना तीन गावांमध्ये २५ लाख रुपये खर्चून तर विहीर खोलीकरण ७३ गावांत १ कोटी १९ लाख, १३ गावांतील टँकरसाठी १५ लाख १० हजार रुपये आणि खासगी विहीर अधिग्रहण १०९ गावांत होईल़या तालुक्यातील गावांचा समावेशनागपूर १२, सावनेर ४१, कळमेश्वर ३०, काटोल ५६, नरखेड ७४, उमरेड २, भिवापूर १, कुही ८, मौदा २५.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयwater scarcityपाणी टंचाई