शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन मोबाईल गेमचा नाद : नागपुरात इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:32 IST

पबजीच्या नादाला लागलेल्या एका तरुणाने तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुयोगनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देइमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्यापबजीने बळी घेतल्याचा संशय : उलटसुलट चर्चेला उधाण, सुयोगनगरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पबजीच्या नादाला लागलेल्या एका तरुणाने तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुयोगनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अमन ऊर्फ बॉबी शंकर मानके (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे.अजनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमन नरेंद्रनगरजवळच्या धाडीवाल ले-आऊटमध्ये राहत होता. तो बीबीएचा विद्यार्थी होता. त्याने यापूर्वी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. मात्र, मोबाईलवर ऑनलाईन गेमचे व्यसन जडल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्याला अभियांत्रिकीचा अभ्यास जड जाऊ लागला. परिणामी त्याने अभियांत्रिकीचा नाद सोडून बीबीएला प्रवेश घेतला. मात्र, त्याच्या हातून मोबाईल काही सुटत नव्हता. तो तासन्तास मोबाईलवर पबजी (ऑनलाईन गेम) खेळत राहायचा. यातून अभ्यासासोबतच त्याचे महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. तो नेहमी अस्वस्थ राहायचा. त्याला नैराश्याने ग्रासले होते. या पार्श्वभूमीवर, घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या सुयोगनगर चौकातील श्री शुभम अपार्टमेंटच्या खाली गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास अमनचा मृतदेह आढळला. त्याच्या शरीराची अवस्था बघता सकाळी परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. माहिती कळताच अजनीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष श्रीरामवार आपल्या सहकाऱ्यांसह पोहचले.पोलीस पोहचण्यापूर्वीच तेथे प्रचंड गर्दी जमली होती. अमनचा घातपात केल्याचा संशय घेतला जात होता. त्यामुळे पोलिसांनी अपार्टमेंटच्या चौकीदाराकडे विचारणा केली. चौकीदाराने अपार्टमेंटचे गेट ५ वाजेपर्यंत बंद होते. पहाटे ५ वाजल्यानंतर मी गेट उघडले आणि साफसफाई करू लागलो. त्यामुळे काय घडले, कधी घडले, ते कळलचेच नाही, असे सांगितले. परिणामी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अमन एकटाच इमारतीच्या आत जाताना दिसला. तिसऱ्या माळ्यावर चढून त्याने आत्महत्या केल्याचे पुढच्या माहितीतून स्पष्ट झाले.आत्महत्या करण्याचे ठरविलेच होते!अमनचा मोठा भाऊ मुंबईत नोकरीला आहे, तर वडील शंकर मानके आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते बुद्धगयाला गेले होते. त्यामुळे अमन आणि त्याची आईच घरी होती. अस्वस्थ अवस्थेत बुधवारी सायंकाळी अमनने स्वत:च्या हातावर ब्लेडने चिरे मारले. आईने नातेवाईकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करून घेतले. त्यानंतर पहाटे आई निद्रावस्थेत असताना अमन घरातून बाहेर पडला आणि त्याने आत्मघात करून घेतला. पोलिसांकडून ही आत्महत्या पबजीचा बळी असल्याचे सांगितले जात असले तरी अमनच्या कौटुंबिक सूत्रांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. मात्र, आधी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि पुढे काही तासानंतर बाजूच्या इमारतीत जाऊन तिसऱ्या माळ्यावरून उडी मारणे, म्हणजे अमनने आत्महत्येचा निर्णय बुधवारी सायंकाळीच घेतला होता, हे उपरोक्त घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे.दोन आठवड्यात दुसरी घटनामोबाईलच्या नादाला लागून तासन्तास ऑनलाईन गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दोन आठवड्यातील ही दुसरी घटना होय. २६ सप्टेंबरला पारडीतील कोमल कैलाश चहांदे या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ती केडीके कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाला शिकत होती. कोमल तासन्तास मोबाईलमध्ये गुंतून राहायची. पबजीच्या नादाला लागून तिने आत्महत्या केल्याची त्यावेळी जोरदार चर्चा होती.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीPUBG Gameपबजी गेम