शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

आदेश न पाळणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:49 IST

नागपूरचे वाढत असलेले तापमान पाहता शालेय विद्यार्थी उष्माघाताने बळी पडू नयेत म्हणून दुपारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत अतिशय कडक असून हे आदेश न पाळणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रवींद्र खजांजी यानी दिले आहेत.

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे वाढत असलेले तापमान पाहता शालेय विद्यार्थी उष्माघाताने बळी पडू नयेत म्हणून दुपारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत अतिशय कडक असून हे आदेश न पाळणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रवींद्र खजांजी यानी दिले आहेत.उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. तेव्हा शालेय विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू नयेत म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.हवामान खात्याने विदर्भात उन्हाळा अधिक तापणार असून, येणाऱ्या दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत दिले आहेत. तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी व्यक्त करीत मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खासगी शाळा व विद्यालये बंद ठेवण्यात याव्यात. तसेच अतिरिक्त वर्ग घ्यायचे असल्यास ते सकाळच्या सत्रात घ्यावे. सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा महाविद्यालये सुरु ठेवावेत, असे आदेश दिले. सीबीएसई व आयसीएसई शाळांच्या प्राचार्यांना सुद्धा यासंंबधीचे आदेश जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ज्या शाळा व महाविद्यालये या आदेशाचे काटेकोर पालन करणार नाहीत, त्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश निवासी उपजजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.कारवाई होणारशालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात त्रास होऊ नये, त्यामुळे उन्हात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची अवहेलना करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार होत असेल तर अशा शाळांविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.रवींद्र खजांजीनिवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीशिक्षणाधिकाऱ्यांनी उन्हाळी सुट्या केल्या जाहीरशाळा महाविद्यालयांना येत्या १३ मे पासून उन्हाळी सुट्या लागणार होत्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानंतर जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. एस.एन. पटवे यांनी गुरुवार (२ मे पासूनच) उन्हाळी सुट्या जाहीर केल्या असून त्या २५ जूनपर्यंत राहतील. तसे आदेश त्यांनी जारी केले असून ते सर्व राज्य मंडळ मान्यता प्राप्त सीबीएसई, आयसीएसईच्या सर्व व्यवस्थापनाच्या खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू आहेत. २ मे ते १२ मे मधील सुट्या या पुढील प्रदीर्घ सुट्यांमध्ये समायोजित करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.या शाळांना विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे नाही का?जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही काही शाळांनी विशेषत: खासगी शाळांनी त्याचे पालन न केल्याची माहिती आहे. उद्या या विद्यार्थ्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी शाळा घणार आहे का, असा संतप्त सवाल काही पालकांनी लोकमत कार्यालयात फोन करून केला आहे.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयSchoolशाळा