शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:17 IST

एका अहवालानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू, खर्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले आहे. शिक्षण विभागाने अहवालाची गंभीरता लक्षात घेऊन, जिल्ह्यात तंबाखुमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे तंबाखुमुक्त अभियान शाळांना दिल्या जाणार आकस्मिक भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका अहवालानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू, खर्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले आहे. शिक्षण विभागाने अहवालाची गंभीरता लक्षात घेऊन, जिल्ह्यात तंबाखुमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या अभियानात शिक्षकांना टार्गेट करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तंबाखु, खर्यापासून मुक्त करायचे असेल, तर शिक्षकांनी ही व्यसने टाळल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाळेत तंबाखू, खर्रा खाणाऱ्या शिक्षकांवर या अभियानांतर्गत कारवाई होणार आहे.नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात जि. प. च्या प्राथमिक शाळा एकूण १०४९, उच्च प्राथमिक शाळा ५१५, तर माध्यमिक १६ शाळा आहेत. अनेक शिक्षक कर्तव्यावर असतानासुद्धा तंबाखू, खर्रा व इतर व्यसन करीत असतात. काही शिक्षक तर विद्यार्थ्यांनाच खर्रा व तंबाखू आणण्यास पाठवितात. जि. प. च्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात हा प्रकार अनेकदा उघडकीसही आला आहे. अनेक शिक्षकांवर कारवाईसुद्धा झाली आहे. जि. प. ने आता स्वच्छता व आरोग्य अंतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रकल्पाची सुरुवात केली आहे. तंबाखूमुक्त शाळेचे ११ निकष या सत्रामध्ये पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी तालुकानिहाय तंबाखूमुक्त अभियानाचे शाळांचे प्रस्ताव मुख्याध्यापकांमार्फत संकलित केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदेर्शानुसार शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी ८ जानेवारीला मनपाच्या डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेचे सहा. शिक्षक डॉ. राजहंस वंजारी यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. डॉ. वंजारी हे जिल्ह्यातील कोणत्याही शाळेला आकस्मिक भेट देऊन तपासणी करणार आहेत. कर्तव्यावर असताना शिक्षक व्यसन करताना आढळल्यास डॉ. वंजारी हे संबंधित शिक्षकाचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाकडून व्यसनखोर शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय डॉ. वंजारी हे स्वयंप्रेरणेने कार्यशाळा घेऊन विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांना व्यसनांचे दुष्परिणामही सांगणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा करण्यावर भरशिक्षण विभागाने जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करून जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याची जबाबदारी सोपविली आहे. शाळांना भेटी देऊन कार्यशाळा घेऊन जागृती करण्यावर भर राहील. शाळा लवकर तंबाखूमुक्त कशा करता येईल यावर भर राहणार आहे.- डॉ. राजहंस वंजारी, समन्वयक

 

 

टॅग्स :Teacherशिक्षक