शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

टंचाईग्रस्त गावांसाठी ४२ कोटी ४८ लक्ष रुपयाचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:26 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.

ठळक मुद्दे१२८५ उपाययोजनांना मंजुरी : ३३ गावात ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूशुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय पाणीटंचाईचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता जितेंद्र्र तुरखेडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टाकळीकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यात ३३ गावांना ५४ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असून यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ तर नागपूर ग्रामीणमध्ये २३ टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठा करताना जंतूविरहित पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची असून पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व टँकरवर जी.पी.आर.एस. यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर पुरवठादारांचे देयक अदा करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना ग्रामीण तसेच नगर परिषद क्षेत्रात पाण्याचा स्रोत निश्चित करताना भूगर्भातील पाणी निजंर्तुकीकरण केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. नगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने वाढत असल्यामुळे या नागरी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले वाडी, वानाडोंगरी, मोवाड, कळमेश्वर येथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.वाडीसाठी वेण्णा धरणाच्या मृत जलसाठ्यातून काही भागाला पाणीपुरवठा होत आहे. तसेच १४ विहिरी व १४ कूपनलिकेव्दारे पाणीपुरवठा होत असून, अंबाझरी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची शुध्दता तपासणी केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.वानाडोंगरी येथे बोरगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असून, वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी योजना म्हणून कान्होलीबारा प्रकल्पातून नवीन नळपाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. यासाठी ४२ हजार रुपये खर्च येणार आहे. ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कळमेश्वर शहरासाठी पेंचमधून पाणीपुरवठा होत असून, या शहराला कोच्छी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना तीन महिन्यात मंजूर होईल. यासाठी मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले. मोवाड नगरपरिषदेला अधिग्रहित केलेल्या विंधन विहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने कृतिआराखड्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.टंचाईसाठी बीडीओ नोडल अधिकारी म्हणून नियुक्तीपिण्याच्या पाण्याच्या टंचाई आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी राहणार आहेत तसेच नगर पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांचेवर संपूर्ण जबाबदारी आहे. उपविभागीय महसूल अधिकारी हे नियंत्रण अधिकारी असून, त्यांनी दर आठ दिवसांनी टंचाई आराखड्यानुसार अंमलबजावणीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.असा आहे कृती आराखडापाणीटंचाई कृतिआराखड्यानुसार ९९५ गावात १२८५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे यासाठी २५ कोटी ९८ लक्ष रुपयांचा खर्च येणार आहे. मंजूर आराखड्यानुसार १० उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, येत्या आठ दिवसात या योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. टंचाई कृतिआराखड्यानुसार ३७४ गावात ६२३ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार असून, यासाठी ८ कोटी ७० लक्ष रुपये, नळयोजनांसाठी विशेष दुरुस्ती ३७५ गावात करण्यात येणार आहे यासाठी १५ कोटी ५० लक्ष रुपये तर विहिरी खोल करणे व गाळ काढणे यासाठी १ कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत खाजगी विहिरींचे अधिग्रहण तात्पुरत्या नळयोजनांची दुरुस्ती आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयwater scarcityपाणी टंचाई