शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाची कारवाई :२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:29 IST

बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

ठळक मुद्देनियमित शिक्षक नसल्याने ८२ महाविद्यालयांना धक्का : विद्यार्थ्यांनो सावध व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील ९८ महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. शिवाय महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते. विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. यासंदर्भात २९ महाविद्यालयांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही. ८२ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोईसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत.मागील वर्षीदेखील लावली होती प्रवेशबंदीनागपूर विद्यापीठाने या महाविद्यालयांना वारंवार इशारा दिला होता. संबंधित महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. मागील वर्षीदेखील अगोदर ७४ व त्यानंतर ४० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली होती. जर मागील वर्षीच प्रवेशबंदी लावली तर त्यांचे संलग्नीकरण कायमस्वरुपी रद्द का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नामांकित महाविद्यालयांचा समावेशप्रवेशबंदीच्या या यादीमध्ये नागपुरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. शिक्षक, कर्मचारी नसल्यामुळे अनेक मोठ्या महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी लावण्यात आली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी