शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्ससह मिठाई विकणाऱ्या नागपुरातील प्रतिष्ठानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:43 IST

दिवाळीत कागदी बॉक्ससह मिठाई विकणाऱ्या १९ प्रतिष्ठानांवर वैधमापनशास्त्र विभागाने करून नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवजनात मिठाई कमी:वैधमापनशास्त्र विभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत कागदी बॉक्ससह मिठाई विकणाऱ्या १९ प्रतिष्ठानांवर वैधमापनशास्त्र विभागाने करून नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे.विभागाने नागपुरात दिवाळीत विशेष तपासणी मोहीम राबविली. त्यात मिठाईची विक्री करणाऱ्या ५० पेक्षा जास्त रेस्टॉरंटची तपासणी केली. त्यापैकी १९ रेस्टॉरंटमध्ये वजनात बॉक्समध्ये मिठाई ठेवून विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्याचवेळी त्यांना नोटीस बजावण्यात आल्या. विभागात त्यांची सुनावणी होऊन दंड आकारण्यात येणार आहे. एक किलोपर्यंत मिठाई खरेदी करताना ग्राहकांना बॉक्सच्या वजनाएवढी ३० ते ७० ग्रॅमपर्यंत मिठाई कमी मिळते. मिठाईची किंमत पाहता ग्राहकांना १५ ते २५ रुपयांचा फटका बसतो. ग्राहक बॉक्समध्ये मिठाई खरेदी करतो तेव्हा त्यांना त्याची कल्पना नसते. अशाप्रकारे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊन आर्थिक तोटा होतो.दुकानदारांनी केवळ वस्तूंचे वजन करावेवैधमापनशास्त्र विभागाच्या नियमानुसार पॅकिंग वस्तू, किराणा दुकानातून खरेदी किंवा रेस्टॉरंटमधून खरेदी करताना ग्राहकांनी मॅन्युअल अथवा डिजिटल तोलमापन यंत्र निरखून पाहावे आणि नंतरच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना कागदी बॉक्सचा वस्तूच्या वजनात समावेश होत नाही.भाजीबाजारात कांदे वा बटाटे खरेदी करताना दुकानदार काट्यात भांडे ठेवून वजन करतो. अशावेळी ग्राहकांनी आधी भांड्याचे वजन तपासून पाहावे आणि नंतरच खरेदी करावी. पण अनेकदा ग्राहकांचे लक्ष विचलित करून दुकानदार कांदे आणि बटाटे भांड्यासह मोजून देतात. त्यामुळे ग्राहकांना वजन कमी मिळून त्यांचे नुकसान होते.ग्राहकांनीही दक्ष राहावेबाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकांना दक्ष राहण्याची गरज आहे. दिवाळीत अनेक रेस्टॉरंटमध्ये बॉक्ससह मिठाईची विक्री केल्याचे दिसून आले. बॉक्ससह मिठाईची विक्री न करण्याची सूचना रेस्टॉरंट चालकांना विभागाने पूर्वीच दिली आहे. त्यानंतरही बॉक्ससह मिठाई विक्री सुरूच आहे. विभागाने दिवाळीत मोहीम राबवून रेस्टॉरंटची तपासणी केली आणि १९ प्रकरणांमध्ये ग्राहकांना मिठाई कमी मिळाल्याचे आढळून आले. नियमानुसार त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागून दंड आकारण्यात येणार आहे.हरिदास बोकडे, सहायक नियंत्रक,वैधमापनशास्त्र विभाग, नागपूर.

टॅग्स :raidधाडfoodअन्न