काेंढाळी : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने संचारबंदी व जमावबंदी सुरू केली आहे. दरम्यान, काेंढाळी पाेलिसांनी नियमांचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. साेबतच मास्क न वापरणे तसेच बँक व दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली गेली.
काेंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्या नेतृत्वात सहायक पाेलीस निरीक्षक प्रभू ठाकरे, उपनिरीक्षक राम ढगे, सहायक फाैजदार दिलीप इंगळे यांच्या पथकाने गुरुवारी मेन राेड, बाजार चाैक, बसस्थानक, बँक शाखा आदी ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या ३० नागरिकांविरुद्ध कारवाई केली. तसेच विनामास्क फिरणाऱ्या ४३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी मास्कचा वापर करावा तसेच विनामास्क ग्राहकांना काेणतीही वस्तू देऊ नये, पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र दिसून आल्यास कारवाई केली जाईल. काेंढाळी येथील बँक शाखा व एटीएम येथे नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहनही पाेलिसांनी यावेळी केले.