शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:44 IST

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात सायबर सेलला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास कारवाई होऊ शकते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात सायबर सेलला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत प्रशासनातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर चुकीची माहिती परवली जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुलीलाही कोरोना झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत सायबर सेलकडे तक्रार केली असून अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांनीही जास्त पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शाळांना सध्या तरी सुटी देण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रकोप टाळण्यासाठी महामेट्रोतर्फे उपाययोजनासंपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याची गंभीर दखल महामेट्रोने घेतली असून आपल्या स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या संबंधाने मेट्रो स्टेशन आणि इतरत्र पावले उचलली जात आहेत. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांकरिता प्रत्येक स्टेशनवर घोषणा करण्यात येत आहे. याअंतर्गत या रोगाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याकरिता आणि याची लागण होऊ नये म्हणून आवश्यक माहिती दिली जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाने कुठली काळजी घ्यावी आणि या रोगाची नेमकी लक्षणे काय व ती जाणवल्यास काय करायला हवे, याची माहितीही देण्यात येत आहे. केंद्र सरकारने प्रसारित केलेल्या उद्घोषणा स्टेशनवरून प्रसारित केल्या जात आहेत. याशिवाय माहिती देणारे फलक स्टेशनवर लावले जात आहेत. आॅरेंज आणि अ‍ॅक्वा मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोच्या ताफ्यातील सर्वच रेल्वे आणि स्टेशनच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते आहे. महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही या रोगाच्या निमिताने अधिक सतर्क केले आहे. एकीकडे या सारख्या उपाययोजना होत असताना या रोगाची बाधा होऊ नये, याकरिता नागपूरकरांनी प्रयत्न करावेत, असे महामेट्रोने म्हटले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया