शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुली न वाढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:15 IST

वसुली कार्यक्षमता न वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशाराच महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या प्रादेशिक संचालकांचे निर्देश : नागपूर परिक्षेत्राचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीजबिल वसुलीची कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी नियमित चिंतन व्हायला हवे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या नियमितपणे भेटी घ्याव्या. जर वसुली कार्यक्षमता न वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशाराच महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिला आहे. नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांनी मंगळवारी संयुक्त आढावा घेतला.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत ग्राहकांकडील वीजबिलांची वसुली कार्यक्षमता, थकबाकी, वीजहानी, विविध उपाययोजनांतून वाढलेली वीजविक्री आदी विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्य अभियंते सुहास रंगारी, सुखदेव शेरकर, सुचित्रा गुजर, अनिल डोये, हरीश गजबे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे यांच्यासह पाचही परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महावितरणविरोधातील लोकपाल यांच्याकडील तक्रारींवर अभ्यासपूर्ण युक्तिवाद करणाऱ्या हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांचा दिलीप घुगल यांच्या हस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल