शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सुडाच्या भावनेतून नितेशवर कारवाई, नारायण राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 14:51 IST

आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत प्रश्न विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत नारायण राणेंनी आरोप फेटाळून लावले.

नागपूर : आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभव दिसत आहे. त्यामुळे राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे आज एग्रोव्हीजन या कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत राणेंनी आरोप फेटाळून लावले.

नितेश राणे यांनी काहीही केलेले नाही. त्यांचा संबंधच नाही. सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत. ते कुठेही अज्ञातवासात गेलेले नाही. ते आमदार आहेत. त्यांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. सरकारला जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. कुणालाही मारहाण करण्यात त्यांचा काहीही संबंध नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. अशाप्रकारची कारवाई होत असल्याचे समजल्याने काेर्टात जावेच लागले, असेही ते म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे