शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओत एसीबीची कारवाई : तीन हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 21:26 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाळे टाकून तीन हजाराची लाच मागणाऱ्या विजय विश्वनाथ हुमणे (वय ५०) नामक लाचखोर एजंटच्या मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे आज दिवसभर आरटीओ कार्यालयात भूकंप आल्यासारखे वातावरण होते.

ठळक मुद्देएजंटच्या बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाळे टाकून तीन हजाराची लाच मागणाऱ्या विजय विश्वनाथ हुमणे (वय ५०) नामक लाचखोर एजंटच्या मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे आज दिवसभर आरटीओ कार्यालयात भूकंप आल्यासारखे वातावरण होते.तक्रारदार व्यक्तीच्या डिओ दुचाकीची कागदपत्रे हरविली होती. त्याची मूळ प्रत मिळविण्यासाठी दुचाकीधारकाने आरटीओच्या गिरीपेठ कार्यालयात संपर्क केला होता. या कार्यालयाच्या आवारात दलाल म्हणून फिरणाऱ्या हुमणेने दुचाकीधारकाला गाठले. तीन हजार रुपये दिल्यास तातडीने कागदपत्रे मिळवून देतो, असे त्याने सांगितले. लाचेची रक्कम साहेबांकडे गेल्याशिवाय काम होत नाही, असे हुमणेने ठणकावून सांगितले होते. दुचाकीधारकाला चकरा मारून त्याची प्रचिती आली होती. त्यामुळे दुचाकीधारकाने लाचेची रक्कम देण्याचे मान्य करून सरळ एसीबीकडे तक्रार नोंदवली. उपअधीक्षक सुनील बोंडे यांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर सापळा लावला. त्यानुसार, मंगळवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास दुचाकीधारक हुमणेकडे गेला. त्याने ज्या साहेबांना लाच द्यायची आहे, त्यांच्याकडे घेऊन चलण्यास सांगितले. मात्र, हुमणेने त्याला साहेबांकडे नेण्याचे टाळले. आपल्याकडे रक्कम मिळाल्यानंतर साहेबांकडे ती बरोबर पोहचते आणि लाच देणाऱ्याचे कामही होते, असे त्याने सांगितले. त्यानुसार, दुचाकीधारकाने लाचेचे तीन हजार रुपये हुमणेला दिले. हुमणेने ही रक्कम स्वीकारताच बाजूलाच घुटमळणाऱ्या एसीबीच्या पथकाने हुमणेच्या मुसक्या बांधल्या. एसीबीचे उपअधीक्षक श्रीकांत धीवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक रवी डहाट, शिपाई मंगेश कळंबे, मंजुषा बुंधाळे, अस्मिता मेश्राम यांनी ही कामगिरी बजावली.कारवाईतून इशाराएसीबीने गेल्या अनेक दिवसानंतर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात पाय ठेवला. माजी अधीक्षक पाटील यांच्या प्रकरणातून आरटीओ, फॉरेस्ट, महसूल विभागातून एसीबीच्या अधिकाऱ्यांना महिन्याला ५० लाखांची देण येत असल्याचा खळबळजनक खुलासा झाला होता. एसीबीकडून तत्पूर्वी आणि त्याहीनंतर आरटीओच्या कोणत्याच मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने या खुलाशाला बळ मिळाले होते. आजही एजंट पकडला गेला, मात्र ही लाच कोणत्या अधिकाऱ्यासाठी मागण्यात आली होती, तो अधिकारी कारवाईच्या टप्प्यात सापडला नाही. त्यामुळे ही कारवाई म्हणजे आरटीओसाठी इशारा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागRto officeआरटीओ ऑफीस