शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:49 IST

नाटककार, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन जागतिक रंगभूमी दिनाच्या पर्वावर पार पडले. विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद महानगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २७ मार्च रोजी सायंटिफिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजागतिक रंगभूमी दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाटककार, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांच्या अभिनय चिंतन : भरतमुनी ते बेर्टोल्ट ब्रेख्त या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन जागतिक रंगभूमी दिनाच्या पर्वावर पार पडले. विदर्भ साहित्य संघ ग्रंथसहवास, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद महानगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २७ मार्च रोजी सायंटिफिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भरतमुनी, स्तनिस्लावस्की, आॅर्तो, ग्रोटोवस्की आणि ब्रेख्त यांच्या अभिनय चिंतनांचा तौलनिक अभ्यास या पुस्तकात डॉ. पराग घोंगे यांनी सादर केला आहे. जागतिक रंगभूमीवरील गेल्या अडीच हजार वर्षांतील कालजायी नाटकातील निवडक स्वागतांचा अभिनयाविष्कार या कार्यक्रमांतर्गत नागपुरातील जुन्या-नव्या कलावंतानी दमदारपणे सादर केला. इसवी सन पूर्व ४२९ ते १९७० या कालखंडातील निवडक जगप्रसिद्ध नाटकातील स्वगते या कार्यक्रमात सादर झालीत. सोफोक्लीज याच्या किंग एडिपस या नाटकातील योकास्ता राणीचे स्वगत दीपाली घोंगे, कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमधील शकुंतलेचे स्वागत गौरी सोनटक्के, क्रिस्टोफर मार्लो यांच्या डॉ. फोस्टस नाटकातील स्वगत सुपंथ भट्टाचार्य, शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि किंग लिअर या नाटकातील स्वगते अनुक्रमे गौरव खोंड आणि प्रकाश लुंगे, हेन्रिक इब्सेन यांच्या अ डॉल्स हाऊस नाटकातील स्वगत माणिक सोहोनी, चेकोवच्या चेरी आॅर्चर्ड नाटकातील स्वगत सीमा गोडबोले, लुईजी पिरांदेलो यांच्या सिक्स कारेक्टर्स इन सर्च आॅफ अन आॅथर या नाटकातील स्वगत नीलकांत कुलसंगे, बेर्टोल्ट ब्रेख्त यांच्या मदर करेज या नाटकातील स्वगत श्रद्धा भारद्वाज, टेनिसी विलियम यांच्या अ स्ट्रीट कार नेम्ड डीसायर या नाटकातील स्वगत पूजा पिंपळकर, बेकेटच्या वेटिंग फोर गोदो या नाटकातील स्वगत सलीम शेख आणि दारिओ फो याच्या अकसिडेंटल डेथ आॅफ अन अनार्चीस्त या नाटकातील स्वगत विनोद तुंबडे या कलाकारांनी सादर केलीत. या कार्यक्रमाची संकल्पना दिलीप म्हैसाळकर यांची होती.

टॅग्स :nagpurनागपूरliteratureसाहित्य