शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक-अपचा बदला घेण्यासाठी प्रियकराचे किळसवाणे कृत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 11:23 IST

मानकापूर येथील तरुणीचे जुने फोटो वापरून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी हा तरुणीचा जुना प्रियकर सचिन यादव असल्याचे समोर आले. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेत घेतले.

ठळक मुद्देसोशल माध्यमाचा वापर करून केली बदनामी

नागपूर : मानकापुरात राहणाऱ्या एका तरुणीचे जुणे फोटो वापरून कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. व त्यावर तरुणीचे अश्लील फोटो आणि काहीबाही पोस्ट करून तिची बदनामी सुरू केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनीा माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. सचिन यादव असे आरोपीचे नाव आहे.

सोशल मीडियाचे फॅड हे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक लहान-सहान गोष्टी आपण क्षणाक्षणाला पोस्ट करत असतो. मात्र, काही गुन्हे प्रवृत्तीचे लोक याचा फायदा घेत तुम्हाला अडचणीत पाडू शकतात. मानकापूर येथील तरुणीचे काही जुने फोटो वापरून फेसबूकवर टाकत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. याबाबत तरुणीला समजले तेव्हा तिला धक्काच बसला मात्र, यामागे कोण आहे हे याची तिला माहिती नव्हती. तिने याप्रकरणी तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी याबाबत शोध घेतला असता आरोपी हा तरुणीचा जुना प्रियकर सचिन यादव असल्याचे समोर आले. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेत घेतले. 

प्रेमप्रकरणातून 'बदला'

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य बदला घेण्यासाठी केल्याचे समोर आले. ब्रेक-अप झाल्याचा राग आरोपी कित्येक दिवसांपासून मनात ठेवून होता. तरुणीला अद्दल घडवून आपला बदला पूर्ण करण्यासाठी त्याने असे केल्याचे कबूल केले. सध्या तो पोलीस कस्टडीत आहे.

सोशल माध्यमं किती सेफ?

सोशल मीडियावर फसवणूकीच्या घटना दररोज आपण वाचत असतो. इंटरनेटच्या या जाळ्यात आपली माहिती ही कितपत सुरक्षित राहू शकते याबाबत प्रत्येकानेच सतर्क राहायला हवे. आजकाल सोशल माध्यमांवर नेहमी अपडेट राहण्याच्या नादात प्रत्येक गोष्टी पोस्ट करत असतो. सायबर चोर याच संधीची वाट बघत असतात आणि फायदा घेतात. 

यापासून बचाव कसा करायचा...

गरज नसेल तर सोशल माध्यमांवर प्रत्येक गोष्टींचे अपडेट टाकण्याची सवय कमी करा. आपला फोन नंबर, इमेल आयडी, सोशल माध्यमांचे पासवर्ड आधार नंबर आदि गोष्टींची माहिती गरज नसताना शेअर करणं बंद करा, एका वेळेनंतर सोशल माध्यमांचे पासवर्ड बदलत राहणे गरजेचे आहे. गरज नसताना एखाद्या उपकरणावर कोणत्याही सोशल माध्यमांचे पासवर्ड ऑटोमॅटीक साइन करून ठेऊ नका. या काही बाबी तुम्हाला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यास मदतप्राय ठरू शकतात. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया