शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात एसीपींच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला

By योगेश पांडे | Updated: March 15, 2024 22:12 IST

नागपूर : नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

नागपूर: नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे (४२, नेमसेडा, चांदुरबाजार, अमरावती) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अगोदर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. सद्यस्थितीत ते सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या वाहनावर चालक म्हणून नेमणूकीस आहे. शुक्रवारी त्यांनी सकाळी एसीपींना कपिलनगर पोलीस टाण्यात सोडले. त्यानंतर ते पोलीस ठाण्याच्या परिसरात गाडी साफ करत होते. त्यावेळी दिलीप रामराव चिनकुरे (५३, एन.आय.टी क्वाॅर्टर, कपिलनगर) हा तेथे पोहोचला.

त्याने थेट धर्माळे यांच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले. त्यात धर्माळे जखमी झाले. त्याने तिसरादेखील वार केला. मात्र धर्माळे यांनी तो चुकवला व आरोपीला धक्का दिला. आरडाओरड ऐकून पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी धावत आले व त्यांनी आरोपीला पकडले. धर्माळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात दिलीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी मनोरुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली होती.

 

 

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर