शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अ‍ॅसिडहल्ला पीडित लक्ष्मी बनली आता दागिन्यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर

By वर्षा बाशू | Updated: January 29, 2018 15:27 IST

दागिने बनवणाऱ्या एका ख्यातनाम कंपनीने काढलेल्या प्रॉमिस बँन्ड या मनगटी विशेष बांगडीसाठी अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या व आता समाजसेवेला वाहून घेतलेल्या लक्ष्मी अग्रवाल- सा यांची निवड केली आहे.

नागपूर: दागिने बनवणाऱ्या एका ख्यातनाम कंपनीने काढलेल्या प्रॉमिस बँन्ड या मनगटी विशेष बांगडीसाठी अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या व आता समाजसेवेला वाहून घेतलेल्या लक्ष्मी अग्रवाल- सा यांची निवड केली आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना प्रॉमिस करीत असतो मात्र आपण आपल्यासोबत प्रॉमिस क्वचितच करतो. प्रॉमिस बँन्डच्या माध्यमातून स्त्रियांनी स्वत:ला काही प्रॉमिसेस द्यावीत व ती पाळावीत असा आशय यातून अभिप्रेत असल्याचे लक्ष्मी यांनी म्हटले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या.

प्रॉमिस बँन्ड ही एक मनगटी बेल्ट किंवा बांगडी आहे. तीत कागदाची एक लहानशी घडी ठेवता येईल अशी सोय करण्यात आली आहे. या कागदावर आपण स्वत:ला एक प्रॉमिस लिहून तो कागद या बांगडीत ठेवायचा आहे. जेणेकरून त्या प्रॉमिसची सतत आठवण आपल्याला राहील व त्यानुसार आपण वाटचाल करू शकू, असा त्यामागचा हेतू लक्ष्मी यांनी स्पष्ट केला. अ‍ॅसिड पिडित महिलांच्या पुनवर्सनासाठी काम करताना आपल्याला, स्त्रियांना सन्मानाहून समान वागणूक अधिक महत्त्वाची वाटते कारण समान वागणूक असेल तर सन्मान हा येतोच असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

आपण नेहमी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलतो. पण पुरुषांवरही अत्याचार होत असतात. आता वेळ आली आहे की स्त्रियांपेक्षा पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलले गेले पाहिजे असे त्यांचे मत आहे.

अत्याचारामागील क्रूर मानसिकतेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, क्रूरता ही मुले सर्वप्रथम घरातच पाहतात. कधी ती वडिलांच्या एखाद्या कृतीत त्यांना दिसते तर कधी आईच्या आक्रस्ताळेपणात. हीच क्रूरता मग त्यांच्या अबोध मनात घर करते आणि पुढे ते त्यानुसार कधीतरी वागतातही. त्यामुळे मुलांसोबत वागताबोलताना आईवडिलांनी फार जास्त काळजी घेतली पाहिजे असे लक्ष्मी यांचे म्हणणे आहे.दिल्लीच्या रहिवासी असलेल्या लक्ष्मी अग्रवाल- सा यांच्यावर सूड भावनेतून एका तरुणाने २००५ मध्ये अ‍ॅसिड फेकले होते. त्यात त्यांचा चेहरा व शरीराचा बराचसा भाग भाजून निघाला होता. त्या अपघातातून सावरल्यानंतर त्यांनी आपले सर्व जीवन अ‍ॅसिड पिडित व समाजसेवेकरिता वाहून घेतले आहे.

टॅग्स :Womenमहिला