शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जीपीएस घड्याळ वाटण्यापूर्वीच मिळाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:31 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ‘जीपीएस घड्याळ’चा उपक्रम राबविल्याने महापालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप सफाई कर्मचाऱ्यांना या घड्याळच मळालेल्या नाहीत.

ठळक मुद्देउपराजधानीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे : सफाई कर्मचारी शोधूनही सापडत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ‘जीपीएस घड्याळ’चा उपक्रम राबविल्याने महापालिकेला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप सफाई कर्मचाऱ्यांना या घड्याळच मळालेल्या नाहीत. सफाई कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी कामावर दिसत नाही. शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे लागलेले आहेत. असे असतानाही पदाधिकारी मात्र शहर स्वच्छ ठेवण्याबाबत महापालिका कटिबद्ध असून विविध उपक्रम राबविले जात असल्याचा दावा करीत आहेत.शहरातील सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्यांना जीपीएस घड्याळ देण्याचा निर्णय घेतला होता. आसीनगर झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नऊ सफाई कर्मचाऱ्यांना या घड्याळाचे वाटप करण्यात आले होते. याचा स्वच्छतेवर चांगला परिणाम झाला होता. सफाई कर्मचारी वेळेवर कामावर येत होते. नेमून दिलेल्या भागात स्वच्छता करीत होते. कर्मचारी कामावर हजर आहे की नाही याची माहिती या घड्याळामुळे मिळत होती. चांगले परिणाम दिसून आल्याने शहरातील सर्व सफाई  कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार ४५०० स्थायी सफाई कर्मचारी व ऐवजदारांना जीपीएस घड्याळी देण्यासाठी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीला प्रत्येक घड्याळासाठी २१६ रुपये भाडे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. हा उपक्रम राबविण्यासाठी झोन स्तरावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या घड्याळाचे वाटप करण्यात येणार आहे. तोपर्यंत सफाई कर्मचारी आपल्या मर्जीनुसार काम करण्यास मोकळे आहे. शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे असेच साचून राहणार आहे. असे असूनही महापालिकेला स्वच्छता सर्वेक्षणात ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक मिळाल्याने शहरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.स्वच्छतेच्याबाबत मनपा कटिबद्धमहापालिके तर्फे शहरात विविध उपक्रम राबवून शहराला अधिक स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे असूनही काही ठिकाणी घाण वा कचरा आढळून आलाच तर परिसर स्वच्छ केला जाईल. आम्ही नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्याबाबत कटिबद्ध आहोत.वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष स्थायी समिती, महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर