शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांपासून पॅरोलवर फरार असलेला आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:17 IST

मध्यवर्ती कारागृहातून सात दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आल्यापासून तब्बल १२ वर्षे फरार असलेला आरोपीस जरीपटका पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देएनडीपीएसचा आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती कारागृहातून सात दिवसाच्या पॅरोलवर बाहेर आल्यापासून तब्बल १२ वर्षे फरार असलेला आरोपीस जरीपटका पोलिसांनीअटक केली.बाळू बाबूलाल अजित (४१) असे आरोपीचे नाव आहे.आरोपी बाळू हा जरीपटका येथील कबीरनगरात राहतो. २००७ साली बाळूच्या विरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत प्रकरण सुरु होते. १५ मे २००७ रोजी त्याच्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान त्याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. कारागृह प्रशासनाने त्याला १५ जून रोजी सात दिवसाच्या पॅरोलवर सोडले होते. त्याला २३ जून २००७ पर्यंत तुरुंगात हजर व्हायला हवे होते. परंतु तो कारागृहात परत न येता फरार झाला. त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात कलम २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. परंतु तो कधीही न्यायालयात हजर राहिला नाही. त्याच्याविरुद्ध वॉरंटही बजावण्यात आले होते. यानंतरही त्याचा शोध लागला नाही. उच्च न्यायालयाने बाळूला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर जरीपटका पोलीस बाळूच्या शोधात होते. अखेर बाळूचा पत्ता लागला आणि जरीपटका पोलिसांच्या चमूने त्याला अटक करून न्यायालयासमोर सादर केले.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक