शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माजी रणजीपटूकडे घरफोडी करणारे आरोपी २४ तासांत गजाआड

By योगेश पांडे | Updated: May 28, 2025 17:38 IST

Nagpur : गांजाच्या व्यसनातून आरोपींनी मारला डल्ला

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीसीएचे क्युरेटर व माजी रणजी क्रिकेटपटू प्रवीण हिंगणीकर यांच्या घरी झालेल्या साडेनऊ लाख रुपयांच्या घरफोडीचा उलगडा झाला आहे. गांजाच्या व्यसनातून एका तरुणाने अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केली होती. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली.

हिंगणीकर हे विवेकानंदनगर परिसरात राहतात. त्यांचा एक मुलगा भुवनेश्वर तर दुसरा पुण्याला वास्तव्याला आहे. ते दर महिन्यात मुलांना भेटण्यासाठी जातात. २२ मे रोजी ते घराला कुलूप लावून पुण्याला मुलाकडे गेले. २५ मे रोजी त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. तिने फोन करून तुम्ही परत आले आहे का अशी विचारणा केली. महिलेने घरात पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. हिंगणीकर यांनी त्यांचे भाचे अनुराग कुलकर्णी यांना घरी पाठविले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हिंगणीकरदेखील नागपुरात परतले. चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता व रोख ९५ हजार, घड्याळ व दागिने असा ९.०७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हिंगणीकर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकूण तीन आरोपी या घरफोडीत सहभागी असल्याची बाब समोर आली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू केला. शहरातील जवळपास ३५ सीसीटीव्ही तपासल्यानंतर यात विशाल पाटील (कुकडे ले आऊट) हा सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलीस त्याच्या घरी पोहोचले, मात्र तो फरार झाला होता. पोलिसांना त्याच्या घरात घरफोडीतील सर्व मुद्देमाल मिळाला. मुद्देमाल घरी ठेवल्यावर विशाल त्याच्या अल्पवयीन साथीदारांसोबत वर्धा येथे एका नातेवाईकाकडे लपून बसला होता. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला व त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला तेथून ताब्यात घेतले. एक आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांनी साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली.

चंद्रपूरमध्येदेखील मारला होता डल्लाविशालचे वडील एका सरकारी कार्यालयात लिपिक आहेत आणि विशालला गांजा ओढण्याचे व्यसन आहे. पूर्वी ते चंद्रपूरमध्ये राहत होते. विशालने तेथेदेखील पाच चोरी केल्या होत्या. विशालला गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे त्याचे वडील नागपूरला आले होते. परंतु येथेही विशालने अजनी पोलिस ठाण्याअंतर्गत ड्रग्जसाठी आणखी दोन चोरी केल्या.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी