शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  प्रेयसीची हत्या करणाऱ्या  आरोपीने घेतले विष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:55 IST

प्रेयसीची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी करणारा आरोपी सचिन किशोर पेंदूर (वय २५, रा. दारोडा, हिंगणघाट, जि. वर्धा) याने विषप्राशन करून आपल्या गावाजवळच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

ठळक मुद्देगंभीर अवस्थेत सेवाग्रामला दाखल : पतीचीही प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेयसीची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी करणारा आरोपी सचिन किशोर पेंदूर (वय २५, रा. दारोडा, हिंगणघाट, जि. वर्धा) याने विषप्राशन करून आपल्या गावाजवळच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला सेवाग्राम इस्पितळात दाखल केले आहे. दुसरीकडे त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला चंद्रकुमार मडावी याची प्रकृती अजूनही चिंताजनक असून, त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाते ले-आऊटमध्ये सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही थरारक घटना घडली होती.पतीसोबत मतभेद झाल्याने बालाघाटमधून गीतीश्वरी चंद्रकुमार मडावी (वय २०) ही नागपूरला येऊन आपल्या आईवडिलाकडे राहू लागली. तिचे येथे आरोपी सचिन पेंदूरसोबत अनैतिक संंबंध निर्माण झाले होते. त्यातून डिसेंबर २०१७ मध्ये हे दोघे बल्लारपूरला (जि. चंद्रपूर) पळून गेले. तेथे दोन महिने राहिल्यानंतर सचिन व्यसनी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे तिला कळले. तो सारखा मारहाणही करायचा. त्यामुळे गीतीश्वरीने आपल्या वडिलांना फोन करून बोलवून घेतले आणि वडिलांसोबत तीन दिवसांपूर्वी नागपूरला परत आली. सचिनपासून धोका होऊ शकतो, असेही आईवडिलांना सांगितले. ते लक्षात घेत तिच्या आईवडिलांनी मध्यस्थामार्फत गीतीश्वरीचा पती चंद्रकुमारला निरोप पाठवून पत्नीला घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार, चंद्रकुमार तीन दिवसांपूर्वी नागपुरात आला. हे सर्व सचिनला माहीत पडले. गीतीश्वरी तिच्या पतीसोबत गावाला जाणार असल्याचेही त्याला कळले. त्यामुळे त्याने गीतीश्वरी आणि तिच्या पतीला संपविण्याचा कट रचला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास चंद्रकुमार आणि गीतीश्वरी हे पती-पत्नी एका झोपडीत साखरझोपेत असताना गीतीश्वरी आणि चंद्रकुमारच्या डोक्यावर कुदळीचे (टिकास) वार केले. यामुळे गीतीश्वरी जागीच गतप्राण झाली. तर, गंभीर अवस्थेतील तिच्या पतीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या हत्याकांडानंतर आरोपी आपल्या मूळगावी वर्धा जिल्ह्यात पळून गेला होता. 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर