शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आॅटोचालकाची भीषण हत्या : आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 19:52 IST

खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थराराने नंदनवनमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनंदनवनमधील खरबी चौकात थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरबी चौकाजवळ आॅटो चालविणाऱ्यांच्या दोन गटातील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. आरोपी आॅटोचालकानी विरोधी गटातील आॅटोचालकाची दिवसाढवळ्या हत्या करून त्याचा अर्धमेल्या अवस्थेतील मृतदेह चौकात आणून फेकला. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या थराराने नंदनवनमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. राजू ऊर्फ राजेंद्र नारायण देशमुख (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो खरबी चौकात आॅटो चालवित होता.नंदनवनमधील या भागात आॅटो चालविणाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या व्यावसायिक स्पर्धेने वादाचे रूप घेतले आहे. त्यामुळे एकमेकांना टोमणे मारणे, शिव्या घालणे, बाचाबाची करणे, असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास याच वादातून राजू देशमुख आणि त्याचा साथीदार चंदू या दोघांनी नीरज चटोले (वय ३८, रा. गंगा लेआऊट, नंदनवन) याला माँ गंगा सेलिब्रेशन हॉलसमोर लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. डोक्याला दुखापत झाल्याने चटोलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी राजू आणि चंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेने आॅटोचालकांमधील वादाचे स्वरूप तीव्र झाले.या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आरोपी आॅटोचालक पक्या आणि पांग्या या दोघांनी त्यांच्या आॅटोतून राजू देशमुखला खरबी चौकात फेकले आणि पळून गेले. राजूच्या शरीरावर चाकूचे घाव होते. तो शेवटचे आचके देत होता. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत जमलेल्या बघ्यांपैकी एकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच नंदनवनचे गस्तीवरील पथक तेथे पोहचले. त्यांनी जखमी राजूला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.कुठे मारले, त्याची शोधाशोधदिवसाढवळ्या वर्दळीच्या चौकात आॅटोचालकांनी विरोधी गटातील आॅटोचालकाची हत्या केल्याचे कळल्याने पोलीसही हादरले. नंदनवनचा पोलीस ताफा, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह अनेकांनी तेथे धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपी हाती लागले नव्हते. आरोपींनी राजूला कुठे पकडले, त्याच्यावर कोणत्या ठिकाणी घाव घातले, ते आरोपीच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त भरणे यांनी लोकतमशी बोलताना दिली.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून