शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यातून गुन्हेगाराचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:28 IST

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या बंदिगृहातून पळ काढला. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने अजनी पोलिसांत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराचा आरोपी : पोलीस ठाण्यातील हलगर्जीपणा उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या बंदिगृहातून पळ काढला. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने अजनी पोलिसांत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. निखिल चैतराम नंदनकर (वय २७) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. तो भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ राहत होता.अजनी पोलिसांनी १६ जूनला एका अल्पवयीन मुलीला पळविण्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास पाचपावलीचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बोंडे यांच्याकडे दिला होता. आरोपी निखिल नंदनकरने तिला पळवून नेल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले, मात्र निखिल फरार झाला होता. चौकशीत निखिलने बलात्कार केल्याचे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी अपहरणासोबत बलात्काराचाही गुन्हा दाखल केला होता.बुधवारी दुपारी निखिल त्याच्या घरी आल्याचे कळताच पोलिसांनी निखिलला भांडेवाडीतील त्याच्या घरून अटक केली. त्याला सायंकाळी ६.३० च्या सुमारास अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून ठाण्यातील बंदिगृहात टाकले. पोलीस शिपाई वनिता हिने त्याला बंदिगृहात डांबल्यानंतर घाईगडबडीत बंदिगृहाच्या दाराचा लोखंडी कोंडा भिंतीच्या कडीत टाकून त्याला कुलूप लावण्याचे टाळले. ती थोड्या वेळेसाठी बाहेर निघून गेली. बंदिगृहावर नजर ठेवण्याची जबाबदारी असणारे अन्य कर्मचारीही दुसरीकडे व्यस्त झाले. त्याचा गैरफायदा घेत निखिलने बंदिगृहाच्या दाराची सळी बाजूला सरकावली आणि बंदिगृहातून बाहेर पडून ठाण्याच्या मागच्या दाराने पळ काढला. रात्री ८.३० ला वनिता बंदिगृहाजवळ आली असता, तिला बंदिगृहात निखिल दिसून आला नाही. निखिल पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने अजनी ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या भागात पोलीस पथके पाठविण्यात आली, मात्र निखिल हाती लागला नाही.प्रकरण दडपण्याचा प्रयत्ननिखिल बेपत्ता झाल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठांना देण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ धावपळ करीत ठाण्यात पोहचले. बंदिगृहावर नजर ठेवण्याची कुणाची जबाबदारी होती, अशी विचारणा करून वरिष्ठांनी त्यांची खरडपट्टी काढणे सुरू केले. परिणामी रात्रभर ठाण्यातील वातावरण गरम होते. या प्रकरणाची माहिती बाहेर जाणार नाही, यासंबंधाने काळजी घेण्याचीही सूचना देण्यात आली. निखिलच्या पलायन प्रकरणाला दडपण्याचे पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. दुसरीकडे निखिलला पकडण्यासाठीही पोलिसांनी रात्रभर प्रयत्न केले. त्याच्या घरी, आजूबाजूला, नातेवाईकांकडे पोलीस धडकले, मात्र निखिल हाती लागला नाही. त्यामुळे हे प्रकरणही दडपण्यात पोलिसांना यश आले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे