शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  आरोपीला २७ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:46 IST

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तहसील पोलिसांच्या हद्दीतील जुन्या चार प्रकरणांवर नुकतेच निर्णय दिले. चारही प्रकरणांतील आरोपींना विविध कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. २७ वर्षे जुन्या एका प्रकरणात आरोपीला विविध कलमाखाली ८०० रुपये दंड ठोठावण्यात आला.

ठळक मुद्देजेएमएफसी न्यायालय : जुन्या चार प्रकरणांवर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तहसील पोलिसांच्या हद्दीतील जुन्या चार प्रकरणांवर नुकतेच निर्णय दिले. चारही प्रकरणांतील आरोपींना विविध कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. २७ वर्षे जुन्या एका प्रकरणात आरोपीला विविध कलमाखाली ८०० रुपये दंड ठोठावण्यात आला.किशोर भिका उकर्डे (४५) असे आरोपीचे नाव असून तो भानखेडा येथील रहिवासी आहे. ९ जून १९९१ रोजी एका लग्नात आरोपी मुलींना छेडत होता. त्यामुळे लग्नातील लोकांनी त्याला हटकले. त्यानंतर आरोपीने हटकणाऱ्यांना शिवीगाळ व घरावर दगडफेक केली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.मेयो रुग्णालय परिसरात राहणारा आरोपी मनोज छोटेलाल समुद्रे (३५) याला दोन प्रकरणांत शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीने १० जून २००८ रोजी रात्री १० च्या सुमारास पंचशीलनगर येथील जनार्धन कोवे यांना विनाकारण मारहाण केली होती. त्या प्रकरणात आरोपीला एक महिना कारावास व १०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, ३० जून १९९३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास आरोपीने रमेश समुद्रे यांना भाल्याच्या पात्याने गंभीर जखमी केले होते. त्या प्रकरणात आरोपीला ३० दिवस कारावास व २०० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली.संतोष गुरुदास टेंभुर्णे (३३) असे चौथ्या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो भानखेडा येथील रहिवासी आहे. त्याने २० जुलै २००८ रोजी दुपारी ३ च्या सुमारास सीए रोडवरील शहीद काकडे प्राथमिक शाळेतील ५०० रुपये किमतीचा लोखंडी बेंच चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात आरोपीला २५ दिवस कारावास व १०० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. व्ही.डी. हुकरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा