शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाला गुंगीचे औषध देणाऱ्यास रेल्वेगाडीतच अटक : गीतांजली एक्स्प्रेसमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:51 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग ठाण्यात तैनात आरपीएफच्या जवानांनी रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन त्यांची रक्कम पळविणाऱ्या आरोपीस रेल्वेगाडीतच अटक केली.

ठळक मुद्देप्रवाशाच्या खिशातून पळविले ३० हजार रुपये

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग ठाण्यात तैनात आरपीएफच्या जवानांनी रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन त्यांची रक्कम पळविणाऱ्या आरोपीस रेल्वेगाडीतच अटक केली. आरोपीकडून प्रवाशाच्या खिशातून चोरी केलेले ३० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.निजामुद्दीन परमोद्दीन (३५) रा. किसनगंज, बिहार असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचा जवान सुरेश कुमार, राजू आणि आर. एस. विद्यार्थी यांना गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, एस ८ कोचमध्ये ६० क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत असलेला शेख हाशीम (४७) रा. बेमाटी, बंगाल हा प्रवासी टीटीईच्या मदतीने आरपीएफ जवानांजवळ पोहोचला, तो कल्याण ते खडकपुर असा प्रवास करीत असल्याची माहिती त्याने दिली. दरम्यान, एका सहप्रवाशाने त्याला पाणी पाजले. पाण्यात गुंगीचे औषध दिले. यामुळे त्यांना गाढ झोप लागली. दरम्यान त्या सहप्रवाशाने त्यांच्या खिशातून ३० हजार रुपये काढले. माहिती देतानाही हाशीम यांना झोप येत होती.बर्थखाली लपला होता आरोपीरेल्वेगाडी कुठेच थांबली नसल्यामुळे आरपीएफ जवानांना आरोपी रेल्वेगाडीतच असावा, असा संशय आला. तिन्ही आरपीएफ जवानांनी सर्व कोचची पाहणी सुरू केली. काही वेळाचत एस ११ कोचमध्ये निजामुद्दीन एका बर्थखाली लपलेला दिसला. त्याला बाहेर काढून प्रवासी हाशीमच्या समोर आणले असता हाशीमने त्वरित त्यास ओळखले. आरोपीची तपासणी केली असता त्याच्याजवळ चोरी केलेले ३० हजार रुपये होते. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. घाईगडबडीत पाण्यात जास्तीचे गुंगीचे औषध टाकू शकलो नसल्याचे त्याने आरपीएफ जवानांना सांगितले. जास्त औषध टाकले असते तर हाशीम दोन दिवस झोपूनच राहिला असता, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर आरपीएफ जवानांनी आरोपीला दुर्ग लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथून हे प्रकरण गोंदिया लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांनी आरपीएफ जवानांच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेArrestअटक