शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सुनेने 13 लाखांची खंडणी मागितल्याचा सासूचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 19:25 IST

नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली.

नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या आदेशावरून अंबाझरी पोलिसांनी प्रीती (वय ३४) आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.तक्रारदार महिला (वय ५६) अंबाझरीत राहते. दोन वर्षांपूर्वी तिच्या मुलासोबत प्रितीचा विवाह झाला होता. कौटुंबिक कलह वाढल्यानंतर प्रीती नव-याचे घर सोडून माहेरी तेलंगणात निघून गेली.तिने कागज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून कागज पोलिसांनी कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याच्या तपासासाठी ८ आॅगस्ट २०१६ ला पोलीस तक्रारदार महिलेच्या अंबाझरीतील घरी गेले. यावेळी प्रितीचा रवींद्र नामक नातेवाईकाने तक्रारदार महिलेसोबत लज्जास्पद भाषा वापरली. गोपी दीपक तिबडा नामक व्यक्तीने केस सेटल करायची असेल, तर १३ लाख रुपये द्यावे लागेल. पैसे दिले नाही तर पुन्हा दुसरी केस करून फसवण्याची धमकी दिली. यावेळी विजय पचेरियावाला तसेच सौरभ अग्रवाल यांनी उपरोक्त आरोपींच्या मदतीने धाकदपट करीत महिलेच्या घरातील किंमती सामान जबरदस्तीने काढून नेले.या प्रकरणाची तक्रार त्यावेळी महिलेने अंबाझरी ठाण्यात नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरगुती वादाचे स्वरूप असल्याचे सांगून पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे फिर्यादी महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या संबंधाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलिसांनी फिर्यादी महिलेची सून प्रिती आणि तिच्या उपरोल्लेखित नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून अंबाझरी पोलिसांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग करून, धाकदपट करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून जबरस्तीने घरातील साहित्य चोरून नेणे, आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला.प्रकरणात पोलिसांची लपवाछपवीया संबंधाने अंबाझरी पोलीस ठाण्यात वारंवार संपर्क करूनही पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळाली नाही. प्रकरण मोठ्या घरचे आहे, एवढे सांगून एका पोलिसाने फोन कापला. तर दुस-याने माहिती कक्षात माहिती दिली आहे, असे सांगून याबाबत बोलण्याचे टाळले. पोलिसांची ही लपवाछपवी कशासाठी आहे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :MONEYपैसा