शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना शालीमार एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल अटक

By नरेश डोंगरे | Updated: July 24, 2023 22:19 IST

अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून शेतीच्या वादातून त्यांनी नातेवाईकाची हत्या केली.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुंबईहून कोलकाता (हावडा) कडे निघालेली शालीमार एक्सप्रेस येथील फलाट क्रमांक तीनवर थांबली अन् या गाडीच्या जनरल बोगीत धडधड धडधड पोलीस शिरले. मागच्या, पुढच्या डब्यांची तपासणी केल्यानंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रेल्वेस्थानकावरील पोलीस ठाण्यात नेले. हे दोन आरोपी म्हणजे, सुरेश गहले आणि शूभम गहले होय. ते अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून शेतीच्या वादातून त्यांनी नातेवाईकाची हत्या केली आणि ते पश्चिम बंगालकडे पळून जात होते. मात्र, खबर मिळताच सोमवारी दुपारी त्यांना येथील रेल्वे पोलिसांनी शालीमार एक्सप्रेसमधून सिनेस्टाईल अटक केली.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील रहिवासी आरोपी सुरेश गहले आणि त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर या दोघांमध्ये वडिलोपार्जित शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद होता. या पार्श्वभूमीवर, रविवारी दुपारी ज्ञानेश्वर गहले शेतात फवारणी करीत असताना आरोपी सुरेश आणि त्याचा मुलगा शूभम तेथे आले. त्यांनी ज्ञानेश्वर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर लोखंडी पाईप तसेच कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर गहले यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पिता-पूत्र फरार झाले. त्यांचा शोध घेणाऱ्या आकोट पोलिसांना आरोपी गहलेंचे धावते लोकेशन नागपूरकडे दिसल्याने पोलीस सक्रिय झाले. ते ट्रेनमध्ये जात असावे, हे लक्षात आल्यानंतर परिक्षाविधीन पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांनी नागपूर रेल्वे पोलिसांना सोमवारी दुपारी १ च्या सुमारास ही माहिती कळवून आरोपींचे वर्णन सांगितले. त्यानुसार, येथील रेल्वे ठाण्याचे एपीआय सरवदे तसेच कर्मचारी अमोल हिंगणे, सतीश घुरडे, राजगिरे, संजय पटले, प्रवीण खवसे, अमित त्रिवेदी यांनी दुपारी १.३० च्या सुमारास शालीमार एक्सप्रेसचे कोच तपासणे सुरू केेले. समोरच्या डब्यात पोलिसांना आरोपी गहले पिता-पूत्र आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन खाली उतरवून रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती कळताच अकोट पोलीस सायंकाळी नागपुरात पोहचले. रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा ताबा घेऊन पोलीस अकोटकडे रवाना झाले.

आरोपींचा विनातिकिट प्रवास

रविवारी हत्या केल्यानंतर आरोपी गहले बापलेक अकोल्यात दडून होते. सोमवारी सकाळी ते शालीमार एक्सप्रेसमध्ये बसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडे रेल्वेचे तिकिटही आढळले नाही. ते विनातिकिटच प्रवास करीत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी