शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जरीपटक्यात तोंडाला दुपट्टा बांधलेल्या आरोपींचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:07 IST

बाईकवर स्वार होऊन तोंडाला दुपट्टे बांधलेल्या युवकांनी गुरुवारी रात्री जरीपटका परिसरात दगडफेक करून धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड करून एका युवकाला जखमी केले.

ठळक मुद्देयुवकावर हल्ला : दगडफेक करून कार्यालय-वाहनांची तोडफोड

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : बाईकवर स्वार होऊन तोंडाला दुपट्टे बांधलेल्या युवकांनी गुरुवारी रात्री जरीपटका परिसरात दगडफेक करून धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड करून एका युवकाला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जरीपटक्यात महालक्ष्मी अपार्टमेंट आहे. रात्री ११ वाजता बाईकवर स्वार सात-आठ तोंडाला दुपट्टा बांधलेले युवक तेथे पोहोचले. ते अपार्टमेंटच्या खाली जर्नी टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर दगडफेक करु लागले. त्यांनी कार्यालयात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा फोडले. कार्यालयाच्या समोर चारचाकी वाहने उभी होती. हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. या वेळी या मार्गावरून २६ वर्षीय ओसीन अमर गोदानी जात होते. ओसीन ज्युस पिण्यासाठी जात होते. हल्लेखोरांचे लक्ष त्यांच्यावर गेले. त्यांनी हॉकी स्टीक आणि चाकूने गोदानी यांच्यावर हल्ला केला. घाबरुन गोदानी तेथून पळून गेले. त्यांनी गोदानी यांच्या हातावर हॉकी स्टीकने हल्ला करून त्यांना जखमी केले. हल्लेखोर गोदानी यांचा पाठलाग करून त्यांच्यावर वार करीत होते. ओसीनने अपार्टमेंटमध्ये शिरून आपला जीव वाचविला. तोडफोड करून हल्लेखोर फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसर आणि चौकात लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात हल्लेखोरांचा सुगावा लागला नाही. हल्लेखोरांनी अपार्टमेंटमधील रहिवाशासोबत वैमनस्य असल्यामुळे हा हल्ला केल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचा सुगावा न लागल्यामुळे ते गल्लीतून आले असल्याचा संशय आहे. त्यामुळे ते स्थानिक रहिवासी असावे असा अंदाज असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर