शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे, मनपावर दस्तावेज लपवल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:04 IST

मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी याप्रकरणात दाखल केलेल्या उत्तरासोबत काही महत्त्वाचे दस्तावेज सादर केले नाही. दोघांनीही ते दस्तावेज जाणिवपूर्वक लपवून ठेवले, असा नवीन आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. यासंदर्भात गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : मेट्रोच्या कामाचा अंबाझरी तलावाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी याप्रकरणात दाखल केलेल्या उत्तरासोबत काही महत्त्वाचे दस्तावेज सादर केले नाही. दोघांनीही ते दस्तावेज जाणिवपूर्वक लपवून ठेवले, असा नवीन आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. यासंदर्भात गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्याचा अर्ज रेकॉर्डवर घेतला. दरम्यान, महापालिका व मेट्रोने याचिकाकर्त्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी २१ मार्चपर्यंत तहकूब केली. मोहम्मद शाहीद शरीफ जमशेद शरीफ यांनी ही याचिका दाखल केली आहे. अंबाझरी तलाव हेरिटेज असून त्याला धरणाचा दर्जा देण्यात आला आहे. धरण सुरक्षा संघटनेच्या नियमानुसार, धरणापासून २०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु, मेट्रो रेल्वेने अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीलगतच पिलर उभे केले आहेत. त्यामुळे भविष्यात अंबाझरी तलावासोबतच मेट्रो रेल्वेलाही धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता मेट्रोचे बांधकाम अवैध ठरविण्यात यावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणात चेतन राजकारणे यांनी मध्यस्थी अर्ज दाखल करून याचिकाकर्त्याचे समर्थन केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे व अ‍ॅड. अरुण पाटील तर, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. आशिष फुले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMetroमेट्रो