शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पोळ्यानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:35 IST

पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत.

ठळक मुद्देझोपडपट्टी सर्चिंग२४ तास गस्तगुंडांवर नजरनागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत.उपराजधानीत पोळा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येतो. बैल पोळा आणि तान्ह्या पोळ्याच्या मध्ये मारबतची भव्यदिव्य मिरवणूक काढली जाते. मारबत-बडग्याची मिरवणूक उपराजधानीचे सांस्कृतिक वैभव आहे. या मिरवणुकीत सर्व जातीधर्मातील लाखो लोक सहभागी होतात. पोळ्याच्या उत्सवात दारू विक्री आणि जुगारालाही उधाण येते. दारूच्या नशेत वादविवादही घडतात. ते होऊ नये, सर्वांनी उत्साहात आणि आनंदात पोळ्याच्या सणाचा आनंद लुटावा, यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे खास नियोजन केले आहे. त्यासाठी उपराजधानीतील पाचही परिमंडळात गुरुवारी रात्रीपासूनच पोळा बंदोबस्त लावण्यात आला. सर्वाधिक बंदोबस्त परिमंडळ तीनमध्ये लावण्यात आला आहे. तहसील, पाचपावली आणि लकडगंज परिसरात मारबत-बडग्याच्या मिरवणुकीचा जल्लोष सर्वाधिक असतो. त्यामुळे या परिसरात १५ पोलीस निरीक्षकांसह एकूण ९० अधिकारी, ६३२ पोलीस कर्मचारी आणि ४९ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.शुक्रवार सकाळपासून शहरातील संवेदनशील, अतिसंवेदनशील भागात फिक्स पॉर्इंट लावण्यात येणार आहे. झोपडपट्ट्या सर्चिंग मोहीम राबविण्यात येणार असून, सीआर मोबाईल, बीट मार्शल यांना गस्तीसोबतच सूचना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दंगा नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक तसेच अतिरिक्त राखीव पोलीस बल सज्ज ठेवण्यात येणार आहे. गुंडांच्या हालचालींवर लक्ष ठेवून कुठे काही गडबड झाल्यास तात्काळ कोणत्या उपाययोजना करायच्या, त्यासंबंधानेही सूचना देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी भरणाऱ्या जुगारांवरही पोलीस नजर ठेवणार आहेत.आनंदाने, सतर्कपणे सण साजरा करा : पोलीस आयुक्तउपराजधानीतील मारबत-बडग्यांची मिरवणूक देशभरात आकर्षणाचा विषय आहे. या मिरवणुकीत लाखोंची गर्दी होते. सणोत्सवाचे निमित्त साधून समाजकंटक सक्रिय होतात. त्यांचे कलुषित मनसुबे पूर्णत्वास जाऊ नये म्हणून पोलीस प्रयत्नशील आहेतच. मात्र, नागरिकांनीही उत्साह आणि आनंदाने सण साजरा करतानाच सतर्कताही बाळगावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.असा राहणार बंदोबस्त!पोलीस निरीक्षक : ३०अन्य पोलीस अधिकारी : १९०पोलीस कर्मचारी : १५४०महिला पोलीस : २१७होमगार्ड : ४००महिला होमगार्ड : २०० 

टॅग्स :commissionerआयुक्तPoliceपोलिसnagpurनागपूर