लेखा विभागाचा अधिकारी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:07 AM2021-04-11T04:07:10+5:302021-04-11T04:07:10+5:30

टॅक्सी मालकाची फसवणूक : २५ लाख रुपये थकविले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय कार्यालयात टॅक्सी भाड्याने हवी ...

Accounts Officer Gajaad | लेखा विभागाचा अधिकारी गजाआड

लेखा विभागाचा अधिकारी गजाआड

Next

टॅक्सी मालकाची फसवणूक : २५ लाख रुपये थकविले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासकीय कार्यालयात टॅक्सी भाड्याने हवी असल्याची थाप मारून ५ टॅक्सी मालकांची वाहने दोन महिन्यांपासून वापरणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याला पोलीस कोठडीत जावे लागले. सेतूरमन पंजाबीकेशन नंदकुमार (वय ५१) असे या आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून, तो सीपीडब्ल्यूडी कॉर्टरमध्ये राहतो.

शासकीय लेखा विभागात कार्यरत असलेल्या सेतूरमनने आपल्या विभागाला भाडेतत्त्वावर टॅक्सी हवी आहे, अशी थाप मारून पाच वेगवेगळ्या टॅक्सी मालकांची वाहने दोन महिन्यांपूर्वी ताब्यात घेतली. कुणाला ७५ हजार, तर कुणाला ९० हजार रुपये प्रतिमहिना भाडे देईल, अशी थाप सेतूरमनने मारली होती. प्रत्यक्षात दोन महिने होऊन भाड्याच्या रकमेपैकी एक रुपयाही टॅक्सी मालकांना मिळाला नाही. याबाबत सेतूरमनकडे विचारणा केली असता तो वेगवेगळे कारण सांगायचा. संशय आल्यामुळे एका टॅक्सी मालकाने लेखा विभागाच्या वरिष्ठांची भेट घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता ‘आमच्या विभागात तुमची टॅक्सी भाड्याने घेण्यात आली नाही’, असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे फिर्यादी टॅक्सी मालक योगेश नागोरावजी मेश्राम यांनी अन्य टॅक्सी मालकांना ही बाब सांगून त्यांनाही शहानिशा करण्यास सांगितले. त्यानंतर सेतूरमनने फसवणूक केल्याचे उघड झाले. २४.३८ लाख किमतीची वाहने अडवून, भाडे थकविल्यामुळे टॅक्सी मालकांनी या पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी करून सेतूरमनविरुद्ध शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पीएसआय प्रमोद बांबोळे करीत आहेत.

---

Web Title: Accounts Officer Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.